Saturday, July 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांच्या संख्येत वाढ - राज्य निवडणूक आयोगाचा...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांच्या संख्येत वाढ – राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या स्टार प्रचारकांच्या संख्येच्या मर्यादेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक राजकीय पक्षाला २० स्टार प्रचारकांची यादी द्यावी लागत होती. आता स्टार प्रचारकांची संख्या ४० इतकी करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या तसेच तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांची घोषणा अपेक्षित आहे. या निवडणुकीत स्टार प्रचारकांची मर्यादा वाढवून ४० इतकी करण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.

या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, २०२५’ मधील परिच्छेद २६ मध्ये प्रमुख प्रचारकांसंदर्भातील तपशील नमूद केला आहे. त्यातील तरतुदींच्या आधारे स्टार प्रचारकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतलाआहे. या निर्णयानुसार राजकीय पक्षांना स्टार प्रचारकांची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.

ताज्या बातम्या

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून...