Thursday, May 2, 2024
Homeजळगाववाढत्या गर्दीमुळे धोक्याची घंटा

वाढत्या गर्दीमुळे धोक्याची घंटा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील आठ तालुके तर शनिवारी 11 तालुक्यात कोरोनाचा अहवाल निरंक आहे.

- Advertisement -

मात्र, दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढत असलेल्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढीसाठी धोक्याची घंटा आहे. याकडेही महिलांसह नागरिकांनी कटाक्ष टाकणे गरजेचे आहे.

शुक्रवारी,दि.13 नोव्हेंबर रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात 33 आढळली असून आतापर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 53730 झाली आहे.

त्यापैकी 52033 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 1275 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 422 रुग्ण उपचार घेत आहेत.

दिवसभरात बरे होणार्‍या रुग्णांची संख्या 52 झाली आहे. तसेच जिल्ह्यात 96.84 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर 2. 37 टक्कयांंवर आलेला आहे.

यामुळे जिल्ह्यात करोना संसर्गाची साखळी तुटत चालली आहे. मात्र, अजूनही पूर्णपणे जळगाव जिल्हा कोरोना मुक्त झालेला नाही, याचेही भान ठेवणे गरजेचे आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर 19, भुसावळ-2, चोपडा-3, जामनेर-3, रावेर-2, चाळीसगाव-3 आणि मुक्ताईनगर-1 असे एकुण 33 रूग्ण बाधित आढळून आले आहे.तर जळगाव ग्रामीण, अमळनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, पारोळा आणि बोदवड या तालुक्यात निरंक दिसून आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या