Monday, May 4, 2026
HomeनाशिकNashik Dindori News : दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी 'या' तारखेला निवडणूक

Nashik Dindori News : दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी ‘या’ तारखेला निवडणूक

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी नगरपंचायत (Dindori Nagar Panchayat) नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. ८ रोजी निकाल लागणार आहे. नगराध्यक्षा सुनीता लहांगे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तो मंजूर केला होता. यानंतर आज (बुधवार) नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

- Advertisement -

आज दि. २९ रोजी कार्यालयीन (Office) वेळेत व दि. ३० रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन देणे व स्विकारण्यात येणार आहे. तसेच दि. ३० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्राची छाननी होणार आहे. त्यानंतर ५ वाजता नामनिर्देशनपत्रे छाननीनंतर किती अर्ज फेटाळण्यात आली आहेत त्या उमेद्वारांची नावे आणि फेटाळण्याची कारणे सूचना फलकावर प्रसिध्द केली जाणार आहेत. तर दि. ३० रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पिठासिन अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्याचा कालावधी लागणार आहे.

तसेच दि. ७ रोजी ११ वाजता वैध नामनिर्देशनपत्रांची यादी सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर दि. ७ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामनिर्देशन मागे घेता येणार आहे. यानंतर दि. ८ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक लढविणार्‍या व उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची (Candidate) नावे सभेत वाचून दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर मुद्दा क्र.९ च्या कामकाजानंतर लगेचच अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल व निकाल घोषित करण्यात येईल.

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...