मुंबई | Mumbai
भारत विरुद्ध इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात ५ सामन्यांच्या टी २० मालिकेला २२ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ (Team India) निवड समितीने भारतीय संघाची शनिवारी (दि. ११) जाहीर केला आहे. या मालिकेसाठी संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे आयसीसी (ICC) एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघाबाहेर असलेल्या जलदगती गोलंदाज मोहम्मद शम्मीचे (Mohammad Shammi) देखील संघात कमबॅक झाले आहे. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला या मालिकेत संधी देण्यात आलेली नाही. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ध्रुव जुरेल आणि संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.तर नितीश कुमार रेड्डीने आपले स्थान कायम राखले आहे. मात्र, दुखापतीमुळे रियान परागला वगळण्यात आले आहे.
मालिकेसाठी भारतीय संघ खलीलप्रमाणे
सुर्यकुमार यादव (कर्णधार) नितीश कुमार रेड्डी, रिंकुसिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल (उपकर्णधार) अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, मोहम्मद शम्मी, वाॅशिंगटन सुंदर, ध्रुव जुरेल,रवी बिश्नोई, अर्शदिपसिंग,वरूण चक्रवर्ती
सलिल परांजपे, नाशिक