Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभारत-फ्रान्सची मैत्री आणखी दृढ; एआय, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण,औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर भर

भारत-फ्रान्सची मैत्री आणखी दृढ; एआय, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण,औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर भर

मुंबई । वृत्तसंस्था

- Advertisement -

भारत आणि फ्रान्स यांनी मंगळवारी द्विपक्षीय संबंधांना “विशेष धोरणात्मक भागीदारी”चा दर्जा देण्याची घोषणा केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दोन्ही देशांमधील विश्वास, मोकळेपणा आणि महत्त्वाकांक्षा यावर आधारित नातेसंबंध पारंपरिक राजनैतिक चौकटीपेक्षा वेगळे असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या प्रतिनिधीमंडळ पातळीवरील चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. मॅक्रॉन यांच्या भारताच्या दौऱ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण आणि औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (IMEC) प्रकल्पासाठी सचिवालय स्थापन करण्याचाही निर्णय झाला.

संरक्षण सहकार्याच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांनी कर्नाटकातील वेमागल येथे टाटा-एअरबस H125 हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. पहिल्या ‘मेड इन इंडिया’ हेलिकॉप्टरची डिलिव्हरी २०२७ च्या सुरुवातीला अपेक्षित आहे. हा प्रकल्प टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स आणि एअरबस यांचा संयुक्त उपक्रम आहे.

मॅक्रॉन यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारत-फ्रान्स सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. फ्रान्स हा व्यवहारिक नव्हे तर दीर्घकालीन विश्वासू भागीदार बनू इच्छितो, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्स हा भारताचा सर्वात जुना धोरणात्मक भागीदार असल्याचे सांगत संरक्षण, अवकाश आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याला अभूतपूर्व गती मिळाल्याचे अधोरेखित केले. दोन्ही देशांनी इंडो-फ्रेंच एआय इन हेल्थ सेंटर, डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर आणि एरोनॉटिक्स स्किलिंग सेंटर अशी तीन नवीन संस्थाही सुरू करण्याची घोषणा केली.

भारत-युरोप संबंधांसाठी २०२६ हे “टर्निंग पॉइंट” वर्ष ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मोदी यांनी वाढती भागीदारी जागतिक अनिश्चिततेच्या काळात अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदावर भाजपच्या नेत्यांची बिनविरोध...

0
पुणे | Pune महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (Maharashtra Olympic Association) अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये गेल्या वर्षी मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले होते. त्यावेळी अध्यक्षपदासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...