दिल्ली | Delhi
सध्या कोरोना (Coronavirus) रुग्णांमध्ये घट झाली असली तरी नव्या विषाणूनं डोकं वर काढलं आहे. हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सर्दी आणि सततचा खोकला यावर औषधही काम करेनाशी झाली आहेत. औषधं घेतल्यानंतरही बहुतेकांना खोकल्यापासून पूर्णपणे आराम मिळालेला नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नं हा नवा व्हायरस असल्याचं सांगितलं आहे.
ICMR नं दिलेल्या माहितीनुसार, हे एका प्रकारच्या इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे होत आहे. H3N2 हा एक विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरतो. सध्या देशात इन्फ्लूएंझा A चा H3N2 व्हायरसचा संसर्ग वाढला आहे. H3N2 मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
आजीची सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्याला १० वर्षाच्या नातीने दाखवला इंगा, पुण्यातील VIDEO व्हायरल
दरम्यान H3N2 इन्फ्लुएंझा या व्हायरसमुळे कर्नाटकमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी पहिल्यांदाच समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये इन्फ्लूएंझा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत H3N2 चे ९० रुग्ण आढळून आले आहेत.
खतासाठी जात! सांगलीतील प्रकारावरून विधानसभेत खडाजंगी; CM शिंदे म्हणाले…
इनफ्लुएंझा म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिलेल्या माहितीनुसार इनफ्लुएंझा व्हायरस चार प्रकारचा असतो A, B, C, D असे चार प्रकार त्यात असतात. त्यातल्या A-B टाइपचे व्हायरस हे वातावरणातल्या बदलांमुळे पसरतात आणि आजारांचा प्रादुर्भाव होतो. इनफ्लुएंझा A हा टाइम महामारीसाठीही ओळखला जातो. या टाइप A चे दोन सबटाइम असतात एक असतो H3N2 आणि दुसरा H1N1. इनफ्लुएंझा टाइम B चे सबटाइप नसतात. टाइप सी हा फारसा गंभीर नाही. तर टाइप डी हा प्राण्यांमध्ये असतो.
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया संघ हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरला… कारण काय?
H3N2 ची लक्षणं काय आहेत?
Who ने दिलेल्या माहितीनुसार H3N2 संक्रमित रूग्णांमध्ये खोकला, कोरडा खोकला, ताप, डोकेदुखी, सांध्यांमध्ये दुखणं, थकवा येणं, गळ्यात खरखर आणि नाक वाहणं ही लक्षणं दिसतात. सुरूवातीला अनेक रूग्णांना ताप येतो त्यानंतर सर्दी, खोकला आणि अंगदुखी तसंच इतर लक्षणं दिसू लागतात असंही WHO ने म्हटलं आहे. तसंच अनेक रूग्णांमध्ये ताप आला पाच ते सात दिवसात बरा होतो पण सर्दी-खोकला बरा व्हायला दोन ते तीन आठवडे जातात.
Womens Day 2023 : अंधकारातून ‘ती’ नेते प्रकाशाकडे…! ‘लाईनवुमन’चा हा VIDEO पाहून तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट
इन्फ्लुएंझाचा कुणाला जास्त धोका?
इनफ्लुएंझाची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. मात्र या आजाराचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, म्हातारी माणसं आणि आजारांशी लढणारे रूग्ण यांना जास्त धोका असू शकतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असा सल्ला WHO ने दिला आहे.
Nagaland : BJP बरोबर NCP सत्तेत येणार, कसं आहे विरोधक नसलेलं नवं सरकार?
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ICMRने H3N2 पासून सुरक्षित राहण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, लोकांना नियमित हात धुण्याचा तसेच सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तापची लक्षणे जाणवत असल्यास मास्क घालणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जावू नका. खोकताना आणि शिंकताना तोंडावर हात ठेवणे, डोळे आणि नाकाला स्पर्श न करणे असे सल्ले देण्यात आले आहेत. ताप आणि अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन औषधोचार करावा.




