Sunday, July 26, 2026
Homeदेश विदेशभारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! शत्रुवर रेल्वेवरुन डागता येणार क्षेपणास्त्र; 'अग्नी-प्राईम' क्षेपणास्त्राची रेल्वेवरुन...

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! शत्रुवर रेल्वेवरुन डागता येणार क्षेपणास्त्र; ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची रेल्वेवरुन यशस्वी चाचणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून एक अत्यंत महत्वाचे पाऊल डीआरडीओने उचलले आहे. त्यांनी इंटरमीडिएट रेंज अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र रेल्वेवर आधारीत मोबाईल लाँचिंग द्वारे सोडण्यात आले होते. या प्रक्षेपणानंतर भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोजक्या प्रगत राष्ट्रांच्या यादीत सामील झाला आहे.

पहिल्यांदाच विशेष डिझाईन केलेल्या रेल्वे लाँचिंगवरून अग्नी प्राईम हे मिसाईल लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे कॅनिस्टराईड लाँच सिस्टम असलेल्या काही ठराविक देशांच्या यादीत आता भारताचा देखील समावेश झाला आहे.

- Advertisement -

‘अग्नी-प्राईम’ हे नवीन पिढीचे क्षेपणास्त्र असून त्याची कमाल मारक क्षमता 2000 किमी आहे. या क्षेपणास्त्रात कॅनिस्टराइज्ड लाँचिंग सिस्टीम, अचूक मार्गदर्शन प्रणाली आणि वेगवान प्रतिसाद क्षमतांसह इतर अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे क्षेपणास्त्र स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या वापरासाठी विकसित करण्यात आले असून DRDO ने त्याची रचना व विकास केला आहे.

‘अग्नी प्राइम’ हे क्षेपणास्त्र नवीन प्रोपल्शन प्रणाली, प्रगत नेव्हिगेशन आणि मार्गदर्शन प्रणाली यांसारख्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. हे ‘कॅनिस्टर-लाँच’ प्रणालीवर आधारित असल्याने आवश्यकतेनुसार यास रेल्वे किंवा रस्त्याच्या मार्गाने सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते.

याचे परिक्षण ओडिसा येथील चांदीपूर इंटिग्रेटेड टेस्टिंग रेंजमध्ये करण्यात आले. रेल्वे लाँचरवरून हे क्षेपणास्त्र लाँच करता येत असल्यामुळे देशभरात रेल्वेचे जाळे पसरलेल्या कोणत्याही ठिकाणावरून कधीही हल्ला करता येतो.

या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून DRDO, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारताने रेल्वेवर आधारित मोबाईल लाँचर प्रणालीवरून अंतरमध्य पल्ल्याच्या ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे नवीन पिढीचे क्षेपणास्त्र असून 2000 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्यापर्यंत मारक क्षमता असलेले आहे आणि यात विविध अत्याधुनिक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.

आज रेल्वेवर चालणाऱ्या खास डिझाइन केलेल्या मोबाईल लाँचरवरून झालेली ही प्रकारातील पहिली चाचणी असून, ही प्रणाली रेल्वे नेटवर्कवर कोणत्याही पूर्वअटीशिवाय हालचाल करू शकते, ज्यामुळे वापरकर्त्याला देशभरात हलवण्याची लवचिकता मिळते आणि अत्यल्प वेळेत कमी दृश्यता राखून क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते.’अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राच्या या यशस्वी चाचणीबद्दल DRDO, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) आणि भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन. या यशस्वी उड्डाण चाचणीमुळे चालत्या रेल्वेवरून ‘कॅनिस्टराइज्ड’ लाँच सिस्टीम विकसित करण्याची क्षमता असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “सेलिब्रेशनसाठी त्यांना कारण मिळाल्याचा मला आनंद”; CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...