Saturday, May 30, 2026
Homeदेश विदेशIndia Pakistan Tension: भारत-पाक तणावादरम्यान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची सुरक्षा वाढवली जाणार,...

India Pakistan Tension: भारत-पाक तणावादरम्यान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची सुरक्षा वाढवली जाणार, बुलेटप्रूफ कार मिळणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जयशंकर यांना बुलेटप्रूफ कार आणि कमांडो दिले जाणार आहेत. सध्या दोन्ही देशांदरम्यान शस्रसंधी जरी झाली असली तरीही दोन्ही देशांमध्ये तणाव मात्र कायम आहे. दोन्ही देशांमधील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर शा‍ब्दिक वार केले जात आहेत. जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांशी सातत्याने संवाद ठेवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामुळेच एस जयशंकर यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

एस. जयशंकर यांच्या ताफ्यात विशेष बुलेटप्रूफ वाहन वाढविण्यात येणार आहे. एका खासगी वृत्तसंस्थेच्या सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जयशंकर आता बुलेटप्रूफ कारमधून प्रवास करतील, असे वृत्त वृत्तसंस्थेच्या सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानाभोवतीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. जयशंकर यांच्या ताफ्यात आता बुलेटप्रूफ गाडीचा समावेश करण्यात आला आहे. या गाडीच्या काचा अत्यंत जाड आणि लॅमिनेटेड असतात. त्यामुळे कोणीही गोळीबार केल्यास बंदुकीची गोळी काच भेदून आत येऊ शकत नाही. तसेच गोळीबारात या गाडीचे टायर पंक्चर झाले तरी ही गाडी ५० किलोमीटर अंतर पार करु शकते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ही बुलेटप्रुफ गाडी तयार करण्यात आली आहे.

जयशंकर यांना सुरूवातीला सीआरपीएफ कमांडोंकडून झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. यापूर्वी २०२३ मध्ये त्यांना Y ऐवजी Z दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये ३३ कमांडोंची एक टीम तैनात असते. गेल्या सात महिन्यांत जयशंकर यांची सुरक्षा दुसऱ्यांदा वाढविण्यात आली होती. त्यांना दिल्ली पोलीसांकडूनही सुरक्षा पुरवली जात होती. परंतू, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिल्याने दिल्ली पोलिसांकडून सीआरपीएफने जबाबदारी स्वीकारली होती.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला होता. यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. यामध्ये सीमारेषेपासून १०० किलोमीटर अंतर आत असलेले जैश-ए-मोहम्मद संघटनेचे मुख्यालयही नष्ट करण्यात आले होते. यामध्ये तब्बल १०० वर दहशतवादी ठार झाले होते.

प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून ही भारतावर ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. परंतू, भारताच्या एअर डिफेन्सने हे सर्व हल्ले परतवून लावले होते. यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानमधील महत्त्वाची ठिकाणे आणि हवाई तळ लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये पाकिस्तानच्या महत्त्वाच्या हवाई तळांचे मोठे नुकसान झाले होते. तर अनेक पाकिस्तानी सैनिक भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये ठार झाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...