Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाIND VS PAK : आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान विजेतेपदासाठी भिडणार

IND VS PAK : आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान विजेतेपदासाठी भिडणार

१७ वर्षे जुन्या सामन्याच्या आठवणी होणार ताज्या

नवी दिल्ली | New Delhi

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स टी २० क्रिकेट स्पर्धेचा (World Championship of Legends Trophy) विजेतेपदाचा सामना आज शनिवारी (दि.१३ जुलै) रोजी पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात होणार आहे. यंदाच्या वर्षी दोन्ही संघांमध्ये दुसरा सामना होत असून पहिल्या साखळी सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानने ६८ धावांनी पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारत आज सज्ज असणार आहे. तर भारतीय संघावर सलग दुसरा विजय संपादन करण्याची संधी पाकिस्तानकडे असणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : विधानपरिषदेच्या निकालानंतर अजित पवारांची दिल्लीवारी; अमित शाहांची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबतं?

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत भारतीय संघाचे (Team India) कर्णधारपद माजी अष्टपैलू युवराज सिंगकडे आहे. तर पाकिस्तानची (Pakistan) धुरा यूनूस खानकडे असून हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता सुरु होणार आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरूध्द विजय संपादन करून अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे.

हे देखील वाचा : “आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी तर कुणाला…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूध्द झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात २० षटकांत २५४ धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात भारतीय संघाकडून यष्टिरक्षक फलंदाज राॅबीन उथप्पा, इरफान पठाण आणि युसुफ पठाण या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे हा सामना भारतीय संघाने ८६ धावांनी जिंकला होता.

हे देखील वाचा : संपादकीय : १३ जुलै २०२४ – भूतां परस्परे जडो…

१७ वर्षे जुन्या सामन्याच्या आठवणी होणार ताज्या

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आजच्या सामन्यामुळे १७ वर्षे जुन्या सामन्याच्या आठवणी ताज्या होणार आहेत. २००७ मध्ये खेळल्या गेलेल्या टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. दोन्ही संघातील काही खेळाडू सारखेच आहेत जे त्या फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते. भारतीय संघाकडून युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंग, रॉबिन उथप्पा हे त्यावेळी भारतीय संघात होते आणि हे खेळाडू भारतीय चॅम्पियन्समध्येही आहेत. तर पाकिस्तानकडून शोएब मलिक, युनूस खान, सोहेल तन्वीर, मिसबाह उल हक हे पाकिस्तान संघात होते आणि हे खेळाडू आता पाकिस्तान चॅम्पियन्स संघातही आहेत.

सलिल परांजपे, नाशिक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या