Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढला; भारतीयांना दुतावासाच्या कडक सुचना, कोणत्याही मार्गाचा…

मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढला; भारतीयांना दुतावासाच्या कडक सुचना, कोणत्याही मार्गाचा…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मध्य पूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झालेला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील लष्करी संघर्ष वाढला असून, इराण आणि इस्रायलदरम्यान क्षेपणास्र हल्ले पुन्हा सुरु झाले आहे. इराण ने इस्रायलवर काल मिसाईलने हल्ले केले ज्याच्या प्रत्त्युत्तरात इस्रायलने इराणच्या अनेक लष्करी तळांवर हल्ला केला आहे. मध्य पुर्वेतील दोन्ही देशांदरम्यान पुन्हा एकदा तणाव वाढल्यामुळे इराणमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याचा तसेच सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रविवारी इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्याच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनासाठी अमेरिका थेट जबाबदार आहे. इस्रायलच्या कृती अमेरिकेच्या धोरणांपासून वेगळ्या ठेवता येत नाहीत. इस्रायल जे काही करत आहे, त्यामागे अमेरिकेची धोरणे आहेत, असा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

भारतीय नागरिकांनी इराणचा प्रवास टाळण्याचे कडक निर्देश
तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचे कडक निर्देश दिले आहेत. दूतावासाने स्पष्ट केले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव सध्या तेथे प्रवास करणे योग्य नाही. भारतीय दूतावासाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून इराणमधील भारतीयांना देश सोडण्याचे आवाहन केले आहे. सध्या इराणमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांनी उपलब्ध असलेल्या कोणत्याही मार्गाचा वापर करून तात्काळ देश सोडावा, असे यात म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात अंशतः युद्धबंदी जाहीर झाली होती. मात्र, दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच ठेवल्याने ही युद्धबंदी त्याच दिवशी मोडीत निघाली. रविवारी इस्रायलने हिजबुल्लाहचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बेरूतच्या दक्षिण उपनगरावर जोरदार बॉम्बहल्ला केला. “बेरूतवर हल्ला झाल्यास गप्प बसणार नाही,” असा इशारा इराणने आधीच दिला होता. त्यानुसार हा हवाई हल्ला झाल्यानंतर काही तासांतच इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली.

Sharad Pawar: शेतकरी कर्ज माफीसंदर्भात शरद पवारांनी दिल्या सुचना; म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी संबंधित…

दरम्यान, दरम्यान, इस्रायलने जर आपले हल्ले वाढवले, तर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘बाब-अल-मंदेब’ हा समुद्री मार्ग बंद केला जाईल, असा इशारा इराणने दिला आहे. हा जलमार्ग युरोप, आशिया आणि अरब देशांमधील व्यापाराचा मुख्य कणा मानला जातो. इराणच्या या धमकीमुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...