Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउद्योगमंत्री उदय सामंत उद्या नाशिक दौऱ्यावर

उद्योगमंत्री उदय सामंत उद्या नाशिक दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

उद्योगमंत्री उदय सामंत उद्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून, पहिल्या टप्प्यात निमा कार्यालयाला भेट देणार आहेत. तसेच नाशिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या किमान कौशल्य विकास योजनेअंतर्गत उभारलेल्या भव्य इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

राज्य शासनाने नाशिक आयटीआयला मॉडेल आयटीआय बनवण्याचा निर्धार केला असून, या अंतर्गत विविध सुविधांचा विकास केला जात आहे. कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राची गरज भागवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दुपारनंतर उद्योगमंत्री अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत. रात्री सात ते दहा या वेळेत हॉटेल ट्रीट नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक होणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी पक्षकार्याला गती देण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...