Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याIPL-2021 : सुपर ओव्हर मध्ये दिल्लीचा हैदराबादवर विजय

IPL-2021 : सुपर ओव्हर मध्ये दिल्लीचा हैदराबादवर विजय

चेन्नई । वृत्तसंस्था

आज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा रंजक सामना झाला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर १५९ धावांचे आव्हान दिले .

- Advertisement -

दिल्लीने ४ बाद १५९ धावा केल्यानंतर २० षटकात हैदराबादने ७ बाद १५९ धावा केल्या आणि सामना टाय झाला. हैद्राबाद ने सुपर ओव्हर मध्ये सात धावा केल्या. तर दिल्लीच्या संघाने सुपर ओव्हर मध्ये आठ धावा करून हैदराबादवर विजय मिळविला.

प्रथम फलंदाजी करतांना दिल्लीच्या संघाने चांगली सुरुवात केली. पृथ्वीने हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत १०व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. शिखर धवनला राशिद खानने बाद केले. धवनने २८ धावांचे योगदान दिले. धवन-शॉने ८१ धावांची भागीदारी केली.

धवननंतर पृथ्वीही धावबाद झाला. त्याने ५३ धावा केल्या. त्यानंतर ऋषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दिल्लीस शंभर च्या धावफलकापर्यंत आणले या दोघांनी दिल्लीला १२७ धावांपर्यंत पोहोचविले . कर्णधार रिषभ पंत आणि स्टिव्ह स्मिथ यांनी डाव सावरला.

दोघांनी मिळून ५८ धावांची भागिदारी केली. पंतने २७ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. पंतने ४ चौकार आणि १ षटकार ठोकले. त्यानंतर आलेल्या हेटमायर ही १ धाव करुन बाद झाला. शेवटच्या षटकात स्मिथने केलेल्या धावांमुळे दिल्लीचा संघ ४ बाद १५९ धावांपर्यंत पोहचला.

दिल्लीने हैद्राबादला दिलेल्या १६० धावांचा पाठलाग पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्याच षटकात कर्णधार डेव्हिड वॉर्नर ६ धावा घेऊन बाद झाला . बेअरस्टोने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ३८ धावा केल्या. आवेशने विराट सिंहला बाद करून हैदराबादला धक्का दिला.

विराट सिंहनंतर केदार जाधव मैदानात आला. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. केदारला ९ धावाच करता आल्या.

अक्षर पटेलने एकाच षटकात आभिषेक शर्मा आणि राशिद खानला बाद केले. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. या षटकात विल्यमस आणि सुचितने फटकेबाजी करत १५ धावा केल्या आणि सामना सुपरओव्हरपर्यंत नेला.केन विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या