Thursday, March 13, 2025
Homeक्रीडाIPL 2025 Schedule : आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर; पहिला...

IPL 2025 Schedule : आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर; पहिला सामना कधी?

मुंबई | वृत्तसंस्था | Mumbai

इंडियन प्रीमियर लीगच्या 2025(IPL) १८ व्या हंगामाचे अधिकृत वेळापत्रक (Schedule) जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी आयपीएल चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) अंतिम सामन्यानंतर १२ दिवसांनी सुरू होणार आहे. यंदाचा आयपीएलचा हंगाम २२ मार्च ते २५ मे दरम्यान खेळविला जाणार असून एकूण ७४ सामने १३ वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत.

- Advertisement -

या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरु (KKR vs RCB) आमनेसामने असणार आहेत. गतविजेत्या कोलकाता टीमच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात ईडन्स गार्डनमध्ये हा सामना होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी २३ मार्चला या स्पर्धेतील पहिल्या डबल हेडरचे (एकाच दिवशी २ सामने) आयोजन करण्यात आले आहे.

डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध राजस्थान (SRH vs RR) आमनेसामने असतील. तर दुसरा सामना हा मुंबई विरुद्ध चेन्नई (MI vs CSK) यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईत खेळविण्यात येणार आहे. तसेच प्लेऑफ सामन्याचे आयोजन हे २० ते २३ मे दरम्यान करण्यात आले आहे. तर २५ मे रोजी कोलकात्यामध्ये (Kolkata) अंतिम सामना पार पडणार आहे.

६५ दिवसांत ७४ सामने होणार

यंदाच्या हंगामात एकूण ६५ दिवसांत ७४ सामने खेळविण्यात येणार आहेत. मुंबई आणि चेन्नई हे या स्पर्धेतील दोन यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. आयपीएलमधील हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ या हंगामात एकूण दोन वेळा आमनेसामने येणार आहेत. तसेच आयपीएल २०२५ मध्ये एकूण १२ डबल हेडर सामने होणार असून प्रत्येकी दोन सामने १२ दिवस खेळविले जातील.

१३ शहरांमध्ये खेळविले जाणार सामने

आयपीएलच्या १८ व्या हंगामातील सामने एकूण १३ शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगलुरु, हैदराबाद, लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, धर्मशाळा, न्यू चंडीगढ़, गुवाहाटी आणि विशाखापट्टणम येथे हे सामने खेळविण्यात येणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...