मुंबई | वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीग २०२६चा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) चा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आला. कोलकात्याच्या संघाकडून अजिंक्य राहणे व अंगकृष रघुवंशीच्या दमदार फलंदाजीने ४ गडी बाद २२० धावा करत मुंबईच्या संघास २२१ धावांचे आव्हान दिले. मुंबईच्या संघाकडून रायन रिकल्टन व रोहित शर्माने कोलकात्याच्या संघाने दिलेले लक्ष सहज साध्य केले. ४ गडी बाद २२४ धावा करत मुंबई इंडियन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळविला

नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने फलंदाजीची सुरुवात दमदार केली. अजिंक्य रहाणे आणि फिन लन यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत चौथ्या षटकात हार्दिक पांड्या यांच्या गोलंदाजीवर २५ धावा कुटल्या. पॉवरप्लेअखेर KKR ने ७८/१ अशी मजबूत स्थिती गाठली.फिन लनने १७ चेंडूंमध्ये ३७ धावांची जलद खेळी केली; मात्र शार्दुल ठाकूर याने त्याला बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर रहाणेने संयमी पण आक्रमक फलंदाजी करत अवघ्या २७ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. कॅमेरॉन ग्रीन (१८) यालाही ठाकूरने माघारी धाडले.
१४ व्या षटकात ठाकूरने रहाणेचा (४० चेंडूंमध्ये ६७ धावा) महत्त्वाचा बळी घेतला आणि मुंबईला पुनरागमनाची आशा निर्माण झाली. मात्र त्यानंतर अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग यांनी डाव सावरत जोरदार भागीदारी केली.दोघांनी मधल्या षटकांत धावांचा वेग कायम ठेवत ५० धावांची भागीदारी उभारली. रघुवंशीने २९ चेंडूंमध्ये ५१ धावांची खेळी केली; त्याला हार्दिक पांड्याने बाद केले. शेवटपर्यंत रिंकू सिंग २१ चेंडूंमध्ये ३३ धावा करत नाबाद राहिला.
मुंबईकडून शार्दुल ठाकूर (३/३९) हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मात्र KKR च्या आक्रमक फलंदाजीसमोर मुंबईचे गोलंदाज प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यामुळे KKR ने मुंबईसमोर २२१ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.
मुंबईच्या संघाकडून रायन रिकल्टन व रोहित शर्माने धावांचा वर्षाव करत २२१ धावांचे लक्ष सहज साध्य करत मुंबईच्या संघास विजय मिळवून दिला. रायन रिकल्टनने ४३ चेंडूत ८१ धावा करत अनुकूल रॉय करवी धावबाद झाला तर रोहित शर्माने ३८ चेंडूत ७८ धावा केल्या. सुर्यकुमार यादव १६ धावा करत रिंकू सिंग करवी झेल बाद झाला.हार्दिक पंड्याने नाबाद १८ धावांची खेळी केली




