Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याविश्वास नांगरे पाटलांच्या बदलीची चर्चा; भूमिपुत्र दिघावकर आयुक्तपदी येण्याच्या चर्चांना उधाण

विश्वास नांगरे पाटलांच्या बदलीची चर्चा; भूमिपुत्र दिघावकर आयुक्तपदी येण्याच्या चर्चांना उधाण

नाशिक l प्रतिनिधी
नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाल्याची तसेच बागलाणचे भूमिपुत्र प्रताप दिघावकर यांची नाशिकच्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याची चर्चा नाशिकमध्ये सोशल मीडियात सुरू आहे.

याबाबत प्रशासनाकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. काल (दि 20) रोजी रात्री अचानक सोशल मीडियात दिघावकर यांचे फोटो व्हायरल झाले. सोबत नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून त्यांचे ऑनलाईन अभिनंदन देखील व्हायला सुरुवात झाली.

- Advertisement -

प्रताप दिघावकर हे नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत.
22 व्या वर्षी एसीपी झालेल्या दिघावकारांनी 2000 साली आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. शेतात राबणाऱ्या वडिलांच्या सोबत काम करून रात्रीच्या वेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या दिघावकर यांच्याप्रती नाशिककरांना आदर आहे.

पुण्यात अधीक्षक असताना त्यांच्या कामाची वेगळी छाप त्यांनी पाडली होती.
भूमिपुत्र नाशिक शहराच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेणार असल्याच्या सोशल मीडियावरील बातमीने सर्वांच्याच भुवया मात्र उंचावलेल्या दिसून येत आहेत.

आयुक्त नांगरे पाटील यांच्या बदलीची किंवा दिघावकर यांच्या आहे त्या ठिकाणाहून बदलीची कुठलीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या