Wednesday, December 4, 2024
Homeभविष्यवेधनटराजाची मूर्ती घरी ठेवणे योग्य आहे का ?

नटराजाची मूर्ती घरी ठेवणे योग्य आहे का ?

नटराज म्हणजे भगवान शिवाचे रौद्र रूप आहे आणि याच कारणाने नटराजाची मूर्तीघरी ठेवण्याला मनाई केली जाते. पण ज्यांची नृत्यात रुची असते, अशांच्या घरी नटराजाची मूर्ती पाहायला मिळते. प्रश्न असा निर्माण होतो की नटराजाची मूर्ती अजिबातच घरी ठेऊ नये की काही बदल करून ती घरी ठेवता येईल? भगवान शिव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा ते नटराजाचे रूप धारण करतात. ते या रूपात

तांडव करतात आणि तांडव विनाशाचे नृत्य आहे. जाणकारांचे मत असे आहे की घरी कोणत्याही देवतेची उग्र मुद्रा असलेला फोटो किंवा मूर्ती ठेऊ नये, त्यामुळे घरातील शांती भंग होते आणि घरात कलह वाढतात. तरीही अनेकांच्या घरी नटराजाची मूर्ती पाहायला मिळते, कारण भगवान शिवाची ही नृत्य करतानाची मुद्रा आहे आणि नृत्य करणार्‍या अनेक कलाकारांना यातून प्रेरणा मिळते. दरम्यान हे माहिती असणे आवश्यक आहे की नटराजाची मूर्ती कोणत्या निर्देशांनुसार आणि नियमांना लक्षात ठेऊन घरात ठेवली पाहिजे, जेणे करून त्याच्या ऊर्जेचे दुष्परिणाम घर कमी होतील आणि देवाच्या सौम्यतेचा लाभ मिळू शकेल.

चला तर मग जाणून घेऊ..

भगवान शिव फक्त क्रोधित असताना नृत्यू करत नाहीत, तर ते प्रसन्न असतानाही नृत्यू करतात. त्यामुळे घरी नटराजाची मूर्ती ठेवण्यापूर्वी या गोष्टीकडे लक्ष द्या, नृत्य करणार्‍या या मूर्तीच्या डोळ्यात आनंदी भाव आहे का नाही, का या मूर्तीचा चेहर्‍यावरील भाव कठोर आणि गंभीर आहे. जर मूर्तीच्या चेहर्‍यावर आनंद असेल, ती हसत असेल, आनंदी भाव असतील तर ही नटराजाची मूर्ती घरी ठेवण्यात काहीच अडचण नाही. जाणकारांचे मत असे आहे की, नटराजाच्या मूर्तीच्या शेजारी शिवकामा सुंदरीची (माता पार्वतीचे सर्वांत सुंदर रूप) मूर्ती आवश्य ठेवली पाहिजे. कारण मान्यता अशी आहे की, शिव त्याच्या अर्धांगिनीशिवाय कधीही खुश असू शकत नाहीत. नटराजाची मूर्ती ठेवताना त्याच्या बाजूला भगवान गणेश किंवा इतर देवातांची मूर्ती असू नये. हिंदू देवतांच्या दोन किंवा अधिक पितळी मूर्ती शेजारीशेजारी ठेऊ नये. नटराजाची मूर्ती नेहमी ईशान्य दिशेला ठेवावी, तसेच ती उंच स्थानावर किंवा टेबलवर ठेवावी. नटराजाची मूर्ती ठेवताना जागेबद्दलही दक्ष राहिले पाहिजे. येथे कोणतीही अवजड वस्तू आणि सामानांची गर्दी असू नये. मूर्तीच्या आजूबाजूला पट्टा, चप्पल, बॅग अशा चामडी वस्तू ठेऊ नका, कारण मूर्तीतील उर्जेचा प्रवाह कमी होतो आणि वातावरणात नकारात्मकता निर्माण होते.
जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल, तर मूर्तीची स्वच्छता केली पाहिजे आणि फुले वाहिली पाहिजेत. तसेच मूर्तीला महिन्यातून एकदा विशेषतः प्रदोष दिवशी पवित्र स्नान घालावे.

नटराजाची मूर्ती भेट द्यावी?

नटराजचे नृत्यू पाच प्रकारच्या घडमोडीचे प्रतिनिधित्व करते. सृजन, संरक्षण, विनाश, अवतार आणि मुक्ती. त्यामुळे भगवान शिवाच्या नटराजाच्या स्वरूपाचा अर्थ फक्त विनाश नाही तर विनाशानंतरचा पुनर्जन्मही आहे. नटराजाची मूर्ती प्रतिकात्मकतेने भरपूर आहे, जी आपले आध्यात्मिक मार्गदर्शन करते. याशिवाय नटराजाची मूर्ती महाग अशा धातूंपासून निर्माण केलेल्या कलेचा नमुना आहे. त्यामुळे अशी मूर्ती, ज्यात भगवान आनंदाने नृत्य करत आहे, ती आपल्या प्रियजनांना आणि विशेष करून ज्यांना कला आणि नृत्याची आवड आहे, त्यांना भेट द्यावी.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या