Monday, July 22, 2024
Homeदेश विदेशAditya L-1 Mission: आदित्य एल-१ यान कुठं पर्यंत पोहोचले, कसा सुरु आहे...

Aditya L-1 Mission: आदित्य एल-१ यान कुठं पर्यंत पोहोचले, कसा सुरु आहे प्रवास; इस्रोने दिले महत्वाचे अपडेट

मुंबई | Mumbai

- Advertisement -

चांद्रयान-३ मिशन (Chandrayan Mission) यशस्वी ठरल्यानंतर सध्या सर्वांच लक्ष आदित्य एल-१ मोहिमेवर (Aditya L-1 Mission) आहे. आदित्य एल-१ ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे. पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये एक एल-१ पॉइंट आहे, तिथे आदित्य एल-१ ला स्थापित करण्यात येणार आहे.

आदित्य एल-१ एकप्रकारे भारताची सूर्याजवळची प्रयोगशाळा असेल. सूर्यावर वादळ येतात, स्फोट होतात, त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होतो? आपल्या अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहांना त्यामुळे काय धोका आहे? याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने आदित्य एल-१ मिशन खूप महत्त्वाच आहे.

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकरांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

दरम्यान, इस्रोने याबद्दल आता महत्वाची अपडेट दिली आहे. आदित्य-एल१ची पृथ्वीभोवतीची कक्षा चौथ्यांदा बदलण्यात आली आहे. याला अर्थ बाउंड मॅन्युव्हर (EBN#4) म्हणतात. इस्रोचे सूर्य मिशन सध्या पृथ्वीभोवती २५६ किमी x १२१९७३ किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. त्याची कक्षा बदलताना, मॉरिशस, बेंगळुरूचे ITRAC, श्रीहरिकोटाचे SDSC-SHAR आणि पोर्ट ब्लेअरच्या ISRO केंद्रातून निरीक्षण केले गेले.

आता आदित्यचे पुढील कक्षा बदलण्याचे काम १९ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजता होणार आहे. ज्याला EBN#5 म्हटले जात आहे. पृथ्वीभोवतीचा तो शेवटचा परिभ्रमण असेल. पृथ्वीभोवतीची कक्षा बदलली जात आहे जेणेकरून ती एवढा वेग मिळवू शकेल की ती १५ लाख किमीचा प्रवास पूर्ण करू शकेल. यानंतर ते एल-१ बिंदूकडे म्हणजेच लॉरेन्झ पॉइंटकडे सूर्याकडे जाईल. त्यानंतर ते हॅलो ऑर्बिटमध्ये सुमारे १०९ दिवस प्रवास करेल.

दरम्यान, आदित्य-एल१वरून सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. VELCची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे. इस्रोच्या सन मिशनमध्ये स्थापित VELC सूर्याचे एचडी फोटो घेईल. एल-१पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील. म्हणजे त्यात बसवलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील. तो सूर्याचा अभ्यास सुरू करेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या