मुंबई | Mumbai
राज्यात पुढील चार दिवस सर्वदूर पावसाचा (Rain) अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यात गुरुवारी रत्नागिरी, रायगडला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीदरम्यान ट्रफ पसरला आहे. याबरोबरच गुजरात व विदर्भात हवेची द्रोणीय स्थिती आहे. यामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार आहे.
हे देखील वाचा : “मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा”; उद्धव ठाकरेंचे नाव घेत संजय राऊतांचे मोठे विधान
गुरुवारी रत्नागिरी, रायगडला ऑरेंज अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा जूनचे दोन आठवडेही कोरडेच गेले. मात्र, आता पावसाचे पुनरागमन झाले आहे.
हे देखील वाचा : नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार
मागच्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचे वातावरण आहे. बुधवारीही राज्याच्या अनेक भागांत पाऊस नोंदविण्यात आला. पुढचे चार दिवस राज्याच्या अनेक भागांत पावसाची शक्यता आहे.तर कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जूनअखेर सुरु झाला तरी पावसाने मनसोक्त पावसाची प्रतिक्षाच आहे.तुरळक पाऊस येतो आणि जातो.कालही दिवसभर ढगाळ वातावरण होते.मात्र,पावसाने हुलकावणी दिली.
हे देखील वाचा : यंदाचं पावसाळी अधिवेशन वादळी होणार; ‘या’ विषयांवर होऊ शकते चर्चा
तसेच मध्य महाराष्ट्रातील (Madhya Maharashtra) १० जिल्ह्यात रविवार दि.३० जूनपर्यंत मध्यम पावसाची शक्यता कायम असली तरी आता उत्तर महराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव या तीन जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यात मात्र उद्यापासून आठवडाभर म्हणजे गुरुवार दि. ४ जुलैपर्यंत, गुजरात राज्याच्या पश्चिमेंकडून येणारा अरबी समुद्र शाखीय म्हणजे डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या पावसाची जोरदार शक्यता आहे.
हे देखील वाचा : संपादकीय : २७ जून २०२४ – जलसंवर्धनाचा वारसाच पुढे चालवणे हिताचे
दरम्यान, जिल्ह्याच्या (District) नाशिक, सिन्नर, नांदगाव, निफाड, येवला या ५ तालुक्यात तसेच नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ६ जिल्ह्यात रविवार दि. ३० जूनपर्यंत मध्यम पावसाची शक्यताही तशीच आहे, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी कळविले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा