Saturday, July 4, 2026
Homeजळगावजळगाव : राजकमल चौकात दगडफेक ; अतिक्रमण विभागातील कर्मचारी जखमी

जळगाव : राजकमल चौकात दगडफेक ; अतिक्रमण विभागातील कर्मचारी जखमी

जळगाव –

शहरातील राजकमल चौक येथील भंगाळे गोल्ड शेजारील गल्लीमध्ये ४० ते ५० लोकांच्या जमावाने दगडफेक केल्याने मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकातील एक कर्मचारी जखमी झाला आहे.

- Advertisement -

ही घटना १२ वाजेच्या सुमारास घडली. दीपक कोळी असे जखमी झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. मनपा उपयुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने आज कारवाई करताना काही फळ विक्रेत्यांकडून गोलाणी मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून दिली असताना देखील ते बाहेर विक्री करीत असल्याचे समजल्याने आज दुपारी कारवाई करीत असताना काही लोकांच्या जमावाने कारवाईस गेलेल्या पथकावर दगडफेक केली. यात एक कर्मचारी जखमी झाला असून याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...