Tuesday, November 3, 2026
Homeजळगावतत्कालीन कुलगुरु, कुलसचिवांची चाैकशी करण्याचे आदेश

तत्कालीन कुलगुरु, कुलसचिवांची चाैकशी करण्याचे आदेश

जळगाव – 

कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील हिंदी विभाग प्रमुख डाॅ.बापूराव देसाई यांच्याविरुद्ध प्रा.मुक्ता महाजन लैगिंक अत्याचार प्रकरणाची तक्रार  दाखल झाली हाेती. 

- Advertisement -

या प्रकरणात प्रा.देसाई यांना बडतर्फे करण्यात अाले हाेते. त्याविरुद्ध प्रा.देसाई यांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली हाेती. त्यांची चाैकशी हाेऊन प्रा.देसाई यांनी निर्दाेष मुक्तता झाली हाेती. 

दरम्यान, या प्रकरणात २६ जणांविरुद्ध गुन्हा  दाखल करण्याची मागणी प्रा.देसाई यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल करुन केली हाेती. न्यायालयाने या प्रकरणाच्या चाैकशीचे आदेश दिले आहे .

तत्कालीन प्रभारी कुलगुरु शिवाजीराव पाटील, तत्कालीन कुलसचिव राजकिशाेर गुप्ता, तक्रारदार मुक्ता महाजन, विद्यामान व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांच्यासह २६ जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रा.देसाई यांनी केली हाेती. 

परंतु कनिष्ठ न्यालयालयाने हा खटला फेटाळून लावला. त्याविराेधात प्रा.देसाई यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला. त्यांची न्या.एस.जी. ठुबे यांच्यासमाेर  सुनावणी झाली. 

न्यायालयाने प्रा.देसाई यांचा अर्ज मंजूर करुन फाैजदारी दंडसंहिता कलम २०२ प्रमाणे पाेलिस चाैकशीचे अादेश दिले. डाॅ.देसाई यांच्यातर्फे अॅड.संदीप कापसे यांनी काम पाहिले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक निकाल; खा. लंके, शिंदे, तनपुरे...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध न झालेल्या दहा जागांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या जागांसाठी आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून...