Friday, July 3, 2026
HomeUncategorizedजळगावात कुंटणखान्यावर धाड;  दोन महिलांसह दोघं दलाल ताब्यात

जळगावात कुंटणखान्यावर धाड;  दोन महिलांसह दोघं दलाल ताब्यात

जळगाव  – 

शहरातील गणेश कॉलनी परिसरामधील उदय कॉलनी भागातील एका अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी कुंटणखान्यावर २२ रोजी दुपारी ४ वाजता धाड टाकली. यात कुंटणखान्याच्या मालकिनसह एक पीडित महिला आणि दोन दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतली.

- Advertisement -

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक डॉ.निलाभ रोहन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकाने केली. या प्रकरणातील कुंटणखाना मालकिनवर या अगोदर सन २०१७ मध्ये कुंटणखाना प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे.

आता बुधवारी गणेश कॉलनीतील कारवाईसंदर्भात पोलीस ठाण्यात अजून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दोघं महिला आणि दलालांचे मोबाइल ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी चौकशी सुरू असून अजून बरीच माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, या अगोदर पोलिसांनी शहरातील पिंप्राळा परिसर आणि मेहरुण भागामधील दोन ठिकाणच्या कुंटणखान्यावर धाड टाकली होती. त्यानंतर आता कोरोना पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन, संचारबंदीच्या कालावधीत ही कारवाई झाली आहे.

ताज्या बातम्या

दुर्दैवी : घराचा स्लॅब कोसळला; आजी सह नातवाचा मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon शहरात आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कलेक्टर पट्टा भागातील घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत आजीसह नातवाचा जागीच मृत्यू झाला. दुपारी...