Thursday, July 2, 2026
Homeजळगावतरसोद येथील खंडेराव महाराज यात्रोत्सव रद्द

तरसोद येथील खंडेराव महाराज यात्रोत्सव रद्द

तरसोद, ता.जळगाव ।

येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांचा आज दि.६ एप्रिल रोजी सालाबादा प्रमाणे यात्रोत्सव असून तो अगदी साध्यापध्दतीने साजरा होत आहे. ‘कोरोना’चे जगावर आलेले संकट बघता देशात ‘लॉकडाऊन’ सुरू असून सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक नागरीकाने घरात राहणे गरजेचे आहे.

- Advertisement -

त्यामुळे कोरोनाचे संकट बघता येथील खंडेराव महाराजांच्या यात्रेनिमित्त ओढण्यात येणार्‍या बारागाड्या व इतर सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करत फक्त पुजाविधी करायची आहे, अशा सूचना नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे यांनी ग्रामस्थांना दिल्या आहेत.

कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये असे झाल्यास त्यांचेवर तत्काळ पोलीस कार्यवाही करण्यात येईल असेही श्री.साळुंखे यांनी सांगितले. ग्रामस्थांनी संचारबंदीचे पालन करावे असे पोलीस पाटील गोकुळ शिरूड यांनी सुध्दा सुचीत केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : घरमालकांना लुटणारे ‘बंटी-बबली’ गजाआड; भाडेकरु बनून वास्तव्य,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहरासह (Nashik City) राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि परराज्यांत भाडेकरू म्हणून राहून घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्याच घरात...