जळगाव | Jalgaon
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीत (Mahayuti) जागेसाठी चुरस वाढलेली आहे. भाजपा जागा सोडण्याच्या तयारीत नसली तरी शिवसेनेने देखील कंबर कसली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे जिल्ह्यातील आपल्याकडे किती आमदारांनी ६५० मतदारांपैकी नगरसेवकांचे मतदान (Voting) आहे, याची यादीच सादर केली आहे. भाजपा जर जागा सोडायला तयारच नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीत आपल्याकडे १० मतदार असून या जागेवर नक्कीच विजय मिळण्याचा दावा केला आहे.
या आकडेमोडनंतर शिंदेंनी देखील मूकसंमती दर्शवल्याचे समजते असून जळगावातून पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांचा अर्ज दाखल करण्याचा सेट देखील तयार आहे. आता फक्त मुंबईतील आदेशाची प्रतिक्षा आहे. जागा कुणाला जाईल याचा निर्णय झालेला नसला तरी भाजपात ज्याप्रमाणे इच्छुकांची संख्या आहे, त्याप्रमाणे शिवसेनेत स्पर्धा नाही. आधी नक्कीच आ. किशोर पाटील यांनी आपल्या मुलाचे नाव स्पर्धेत आणले. परंतु त्यानंतर त्यांनी फक्त जागा शिवसेनेला घ्यावी उमेदवार कुणीही असला तरी जीवाचे रान करून आमदारकी मिळवू, असे सांगत उमेदवारीसाठी प्रताप पाटलांचा मार्ग मोकळा केला.
प्रतापसाठी सेना एकवटली
या निवडणुकीसाठी आधीपासून शिवसेनेकडून प्रताप पाटील (Pratap Patil) यांचेच नाव आघाडीवर असल्याने व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संयमी भूमिकेमुळे अवघी शिवसेना प्रताप पाटील यांच्यासाठी एकवटली आहे. त्यामुळे भाजपाला पहिल्यांदाच या जिल्ह्यात आपल्याला स्पर्धक असल्याची जाणीव झाली. त्यावेळी निवडणूक बिनविरोध झाली तर ठिक अन्यथा अन्य पक्षाची देखील मते मोठ्या प्रमाणात प्रताप पाटलांना मिळण्याची शक्यता असल्याने आता फक्त शिंदेच्या आदेशाची वाट शिवसेनेचे नेते पाहत आहेत.
किशोर आप्पांमुळे वाढली चुरस
निवडणूक जाहीर होण्याआधी भाजपाने ही जागा आपलीच असल्याचे गृहित धरून आठ ते दहा संभाव्य नावे समोर केली होती. परंतु जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) भाजपाची दादागिरी सहन न करता शिवसेनेची ताकद देखील भाजपाच्या (BJP) बरोबरीत असल्याची भूमिका घेत जळगावच्या जागेचा सस्पेंस वाढवला. एवढेच नव्हे तर सहकारी आमदारांसह मुंबईत एकनाथ शिंदेंकडे हट्ट धरत जळगावची जागा शिवसेनेकडे घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे किशोर आप्पा यांच्यामुळेच या जागेची चुरस वाढली आहे.




