Monday, August 17, 2026
HomeनगरCrime News : नारळ फोडण्याचा दगड घातला डोक्यात

Crime News : नारळ फोडण्याचा दगड घातला डोक्यात

जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

मोटारसायकल इथे का लावली, तुम्ही मंदिरात जायचे नाही, असे म्हणत मारहाण करत मंदिरासमोर नारळ फोडण्याचा दगड डोक्यात घातल्याने मुकुंद पोकळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून नगर येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत शिवाजी मोरे (वय 53, व्यवसाय- वॉशिंग सेंटर, रा. पोकळेवस्ती, जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, 15 जून रोजी फिर्यादी शिवाजी मोरे व मुकुंद पोकळे हे दोघे मित्र मुकुंद यांच्या मोटारसायकलवरून जामखेड येथून देवदैठण येथे देवदर्शनासाठी गेले होते.

- Advertisement -

तेथून दर्शन करून दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बटेवाडी शिवारातील खर्डा रोडवरील मारुती मंदिर येथे दर्शनासाठी थांबले. त्यांनी मोटारसायकल मंदिरासमोर लावली व दर्शनासाठी मंदिरात जात असताना तेथे आरोपी बाळू उर्फ दिपक मनोहर खरात, रा. बटेवाडी त्याठिकाणी उभा होते. सदर व्यक्तीने, तुम्ही मोटारसायकल इथे का लावली? तुम्ही मंदिरात जायचे नाही, असे म्हणत मोटारसायकलची चावी काढून घेतली व मोटारसायकल खाली पाडली. त्यावेळी मोटारसायकलवर बसलेला मुकुंद पोकळे खाली पडला.

फिर्यादी त्याला उचलत असताना आरोपीने मंदिराजवळ असलेला नारळ फोडण्याचा दगड मुकुंद पोकळे यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. जखमीला नगरला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...