Tuesday, September 8, 2026
HomeनगरJamkhed : जामखेडला कुख्यात गुंड मोहोळकरवर गोळीबार

Jamkhed : जामखेडला कुख्यात गुंड मोहोळकरवर गोळीबार

4 गोळ्या सागरच्या अंगात घुसल्या

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड शहरातील नुराणी कॉलनी परिसरात सात वाजण्याच्या सुमारास येथे कुख्यात गुंड आणि पैलवान सागर मोहोळकर याच्यावर अज्ञात व्यक्तींकडून सात राऊंड गोळीबार करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. 4 गोळ्या सागरच्या अंगात घुसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या धक्कादायक घटनेमुळे जामखेड शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मोहळकर रोडने जात असताना अचानक हल्लेखोराने त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून फरार झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात हलवले आणि पुढील उपचारांसाठी नगरमध्ये नेण्यात आले.

- Advertisement -

सागर मोहळकर हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कलम 307 नुसार त्याच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. तो नुकताच कारागृहातून जामीनवर बाहेर आला होता. जामखेड शहर आणि तालुक्यात त्याची मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. गोळीबाराची माहिती मिळताच जामखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Global Fintech Fest 2026 : यूपीआयने भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी ओळख...

0
मुंबई : वृत्तसंस्था Mumbai पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (८ सप्टेंबर) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ (GFF) चे उद्घाटन करण्यात...