Tuesday, May 5, 2026
Homeक्रीडाRanji Trophy : जम्मू-काश्मीरने रचला इतिहास! कर्नाटकचा पराभव करत पहिल्यांदाच कोरले 'रणजी...

Ranji Trophy : जम्मू-काश्मीरने रचला इतिहास! कर्नाटकचा पराभव करत पहिल्यांदाच कोरले ‘रणजी ट्रॉफी’वर नाव

दिल्ली । Delhi

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू-काश्मीरने एका सुवर्ण अध्यायाची सुरुवात केली आहे. रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या अंतिम सामन्यात बलाढ्य कर्नाटक संघाला धूळ चारत जम्मू-काश्मीरने पहिल्यांदाच रणजी चषकावर आपले नाव कोरले आहे. हा विजय केवळ एका ट्रॉफीचा नसून, जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट क्षेत्रातील एका नव्या क्रांतीचे प्रतीक मानले जात आहे. पहिल्या डावात मिळवलेल्या निर्णायक आघाडीच्या जोरावर जम्मू-काश्मीरने हे ऐतिहासिक यश संपादन केले.

- Advertisement -

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून जम्मू-काश्मीरने प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. फलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत पहिल्या डावात ५८४ धावांचा विशाल डोंगर उभा केला. या डावात शुभम पुंडीरने १२१ धावांची अप्रतिम शतकी खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांनी कर्नाटकच्या अनुभवी गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला आणि मैदानात चौफेर फटकेबाजी करत सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवली.

जम्मू-काश्मीरच्या ५८४ धावांच्या प्रत्युत्तरात कर्नाटकची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. भारतीय संघात पदार्पणाच्या उंबरठ्यावर असलेल्या आकिब नबीने आपल्या धारदार गोलंदाजीने कर्नाटकच्या फलंदाजांना अक्षरशः हतबल केले. आकिबने पाच महत्त्वाचे बळी घेत कर्नाटकचा पहिला डाव २९३ धावांवर रोखला. कर्नाटककडून अनुभवी मयंक अग्रवालने १६० धावांची झुंजार शतकी खेळी केली, मात्र त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ लाभली नाही. परिणामी, जम्मू-काश्मीरला पहिल्या डावात २९१ धावांची मोठी आणि निर्णायक आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या जम्मू-काश्मीरने कर्नाटकला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. त्यांनी दुसऱ्या डावात ४ गड्यांच्या मोबदल्यात ३४२ धावा फटकावल्या. कमरान इक्बालने नाबाद १६० धावांची तडाखेबंद खेळी केली, तर साहिल लोत्रा याने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून कर्नाटकच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. साहिलचे शतक पूर्ण होताच कर्णधार पारस डोगराने डाव घोषित केला.

साखळी सामने आणि बाद फेरीनंतर दोन्ही संघांच्या संमतीने सामना अनिर्णित (Draw) घोषित करण्यात आला. रणजी ट्रॉफीच्या नियमांनुसार, जर अंतिम सामना अनिर्णित राहिला, तर ज्या संघाला पहिल्या डावात आघाडी मिळते, तो संघ विजयी मानला जातो. पहिल्या डावातील २९१ धावांच्या प्रचंड आघाडीमुळे जम्मू-काश्मीरला अधिकृतपणे विजेता घोषित करण्यात आले. विजयाची घोषणा होताच जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंनी मैदानावर एकच जल्लोष केला. त्यांच्या क्रिकेट इतिहासातील ही सर्वात मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी ठरली असून संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...