Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजजिष्णु देव वर्मा यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

जिष्णु देव वर्मा यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य आणि तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी जिष्णु देव वर्मा यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. जिष्णु देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. १२ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी .राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचेकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा तसेच इतर कुटुंबीय, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबईतील विद्यापीठांचे कुलगुरु, राजशिष्टाचार सचिव राजेश गावंडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नरेंद्र

PM Narendra Modi: जनसेवा हीच सुशासनाची मोठी कसोटी…; पंतप्रधान नरेंद्र मोदींची...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारचा १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या...