Thursday, September 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजJyoti Waghmare : संजय राऊत म्हणजे ठाकरे सेनेला लागलेली वाळवी; खासदार डॉ....

Jyoti Waghmare : संजय राऊत म्हणजे ठाकरे सेनेला लागलेली वाळवी; खासदार डॉ. ज्योती वाघमारेंचा हल्लाबोल

पुणे (प्रतिनिधी)

- Advertisement -

संजय राऊत यांची जीभ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली ‘वाळवी’ आहे. ज्याप्रमाणे वाळवी लाकूड आतून पोखरून काढते, त्याप्रमाणे राऊत आपल्याच पक्षाला (उबाठा गट) संपवत असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेच्या सुऊवातीला डॉ. वाघमारे यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आदर राखत त्यांचे सहकारी खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. मी स्वत: पत्रकारितेतून करिअरची सुऊवात केली. 2002 च्या सोलापूर दंगलीत आपण धाडसी रिपोर्टिंग केले, असे सांगत संजय राऊत यांच्या भाषेवर त्यांनी आक्षेप नोंदवला.

राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत ‘प्रेग्नन्सी’ आणि ‘बाळंतपण’ यांसारखे शब्दप्रयोग वापरले. वास्तविक मातृत्व ही एक अत्यंत पवित्र आणि मंगल संकल्पना आहे. तिची अशा प्रकारे राजकीय टवाळकी करणे म्हणजे मवालीपणा आहे. ‘ऑपरेशन तुडवा’ ही मोहीम खरे तर ‘ऑपरेशन उबाठा बुडवा’ आणि ‘काँग्रेस वाढवा’ अशीच आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदांमध्ये वापरलेल्या बीभत्स भाषेचा निषेध करत त्यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली.

आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीची तुलनाच होऊ शकत नाही. आदित्य ठाकरे ‘युरोप वारी’ आणि ‘प्रिंगल्स-कोल्ड कॉफी’ संस्कृतीचे वाहक आहे. तर तर श्रीकांत शिंदे हे विदर्भ-मराठवाड्याच्या 47-48 अंश तापमानात कायकर्त्यांसोबत ‘वडापाव’ आणि ‘कटिंग चहा’ घेऊन काम करतात. पक्ष सोडून गेलेले लोक ‘खोक्मयांमुळे’ नव्हे, तर पक्षनेतृत्वाने दिलेल्या ‘धोक्मयांमुळे’ आणि अविश्वासामुळे बाहेर पडले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. एका साध्या पत्र्याच्या घरातून आलेली, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली महिला आज राज्यसभा खासदार होऊ शकली, हे केवळ शिंदे साहेबांच्या सर्वसमावेशक धोरणामुळेच माझ्याबाबतीत शक्मय झाले. उद्धव ठाकरे यांचा सध्याचा दौरा म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा प्रकार आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात जे ‘मातोश्री’ ते ‘मंत्रालय’ हे काही किलोमीटरचे अंतर कापू शकले नाहीत, ते आता केवळ आपल्या मुलाच्या राजकीय पुनर्वसनासाठी राज्यभर फिरत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

ताज्या बातम्या

Nashik News : आदिवासी विद्यार्थी आंदोलकांशी अभिजित दिपकेंनी भेट देऊन साधला...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik गोल्फ क्लब मैदानावर गेल्या १२ दिवसांपासून विविध न्याय्य मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे सुरू असलेले प्राणांतिक उपोषण आता राज्य सरकारच्या अडचणी वाढविणारे ठरत...