Thursday, June 18, 2026
HomeनगरShirdi : कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी लांबली

Shirdi : कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी लांबली

आरोपीच्या वकिलाची उशिरा हजेरीवर न्यायालयाची नाराजी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

जमीन खरेदी प्रकरणातील आरोपी कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणातील पुढील सुनावणी आता 22 एप्रिल रोजी होणार असून न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

गुरुवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील तसेच सरकारी पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुनावणीच्या सुरुवातीलाच न्यायालयाने आरोपीचे वकिल उशिरा आल्याने नाराजी व्यक्त केली. तरीही तपास अधिकारी आणि दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने सुनावणी पार पाडण्यास न्यायालय अनुकूल असल्याचे दिसून आले.

मात्र याच दरम्यान या प्रकरणातील मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपली बाजू सविस्तर मांडण्यासाठी न्यायालयाकडे अतिरिक्त वेळ मागितला. त्यानंतर न्यायालयाने ही विनंती मान्य करत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि पुढील तारीख 22 एप्रिल निश्चित केली. यामुळे कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामिनाबाबतचा निर्णय पुन्हा एकदा पुढे गेला आहे. या प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडीकडे आता शिर्डीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणात जमीन व्यवहार, बँक खाते तसेच एकच व्यक्ती नॉमिनी म्हणून असल्याने त्या खात्यावरील झालेले कोट्यवधी रुपयाचे व्यवहार यासंदर्भात संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना शिर्डी पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी करण्याचे काम सुरूच आहे. या प्रकरणात मोठे उद्योजक, व्यावसायिक तसेच राजकीय नेते असल्याने पोलिसांना तपास कामात मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना

Shivsena Operation Tiger: शिवसेना ठाकरेंचा पक्ष पुन्हा फुटला; बंडखोर ६ खासदारांनी...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiशिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा फुटल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर...