कल्याण | Kalyan
कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. रिसेप्शनिस्ट तरुणीला परप्रांतीय तरुणाने क्लिनिकमध्ये बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी सदर तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपाल झा या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पूर्वेतील एका लहान मुलाच्या क्लिनिक मध्ये सदर तरुणी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास क्लिनिक मधील डॉक्टराच्या केबिनमध्ये एम आर बसल्याने थोडा वेळ रुग्णांना आत पाठवू नको अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या होत्या. त्यामुळे रिसेप्शनिस्ट तरुणीने रुग्णांना काही वेळ वाट पाहण्यास सांगितले होते, त्यामुळे संतापलेल्या गोपाल झा या पुरूषाने संयम गमावत हे कृत्य केले.
नेमके काय घडलं?
नांदिवली येथील श्री बालचिकित्सा क्लिनिक मध्ये डॉक्टरांच्या केबिनमध्ये घूसणाऱ्या व्यक्तीला आत जाऊ नका, आत लोक आहेत असे रिसेप्शनिस्ट तरुणीने सांगितले, तर त्या व्यक्तीने त्या तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. गोकुळ झा असे मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात गोकुळ झा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
गोपाल झा नावाचा एक माणूस एका रुग्णाला घेऊन डॉक्टरांना भेटण्यासाठी आला आणि त्याने त्याला ताबडतोब भेटण्याचा आग्रह धरला. रिसेप्शनिस्ट मुलीने त्याला वारंवार समजावून सांगितले आणि वाट पाहण्याची विनंती केली. पण गोपाल झा संतापला. त्याने आपला राग व्यक्त केला आणि मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते की सुरुवातीला तो पुरूष त्या तरूणीच्या पोटात लाढ मारतो. नंतर आरोपी मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर खेचतो. यादरम्यान तो तिला अनेक वेळा मारहाण करताना दिसतो. यामुळे या तरुणीच्या अंगावरील कपडे फाटले. या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या या तरुणीने गोकुळ विरोधात मानपाडा पोलिसात तक्रार दिली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गोकुळ झा विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केल्याचे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





