Thursday, March 13, 2025
Homeक्राईमCrime News : कल्याण हादरलं! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या, नराधम...

Crime News : कल्याण हादरलं! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या, नराधम बायकोसह अटकेत

कल्याण । Kalyan

बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता अशाच प्रकारची एक घटना कल्याणमध्ये घडली आहे.

- Advertisement -

एका १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. त्याआधी तिचं अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

२३ डिसेंबरला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. आईकडून २० रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र ती परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला. बराच कालावधी उलटून ही मुलगी परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य दाखवत या प्रकरणाचा तपास सुरू केला.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह कल्याण नजीक बापगाव परिसरात सापडला. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी कोळशेवाडी पोलिसांची ६ पथके तयार करण्यात आली. या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले होते. पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणातील दोन आरोपीची ओळख पटवली. त्याच परिसरात राहणारा विशाल गवळी आणि त्याची पत्नी या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशाल गवळीविरोधात याआधी देखील ४ विनयभंगाचे गुन्हे कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असल्याचे समोर आले आहे. त्याने आतापर्यंत तीन लग्न केली असून सध्या तो तिसऱ्या बायकोबरोबर राहतो. पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत विशालच्या पत्नीने त्याला मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...