Sunday, August 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउन्नत नाशिक अभियानांतर्गत उद्या 'कपिला नदी महा-स्वच्छता अभियान'

उन्नत नाशिक अभियानांतर्गत उद्या ‘कपिला नदी महा-स्वच्छता अभियान’

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती

- Advertisement -

नाशिक । जिमाका वृत्तसेवा Nashik

उन्नत नाशिक अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, नदी संरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रविवार, २८ जून २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत ‘कपिला नदी महा-स्वच्छता अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास राज्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची विशेष असणार आहे, अशी माहिती महानगपालिका प्रशासनाने दिली आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी नद्या, जलस्रोत आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून त्याच अनुषंगाने नाशिक महानगरपालिका (NMC) आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण (NTMKA) यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, मनपाचे गटनेते, पदाधिकारी, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

कपिला नदी स्वच्छता अभियानाचे स्थळ
• के. के. वाघ कृषी महाविद्यालय, सरस्वती नगर (प्रभाग क्र. ३)
• साई नगर (प्रभाग क्र. ३)
• जनार्दन स्वामी मठ (प्रभाग क्र. ३)

वृक्षारोपण कार्यक्रम
• वेळ : सकाळी ८.३० वाजता
• स्थळ : सदाशिव गंगाराम भोरे नाट्यगृहाजवळ, कमल नगर, हिरावाडी

स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक नाशिक घडविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होऊन ‘उन्नत नाशिक’च्या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुल गांधी यांच्याकडून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कॉक्रोज जनता पक्षाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छात्रो की गुंज असे उपक्रम हाती घेऊन राहुल गांधी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत....