पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील करंजी घाटामध्ये मंगळवारी (दि.14) सकाळी सहाच्या सुमारास कोंढापुरी पुणे येथून परभणीकडे वीस ते बावीस टन पाण्याच्या व काही कोल्ड ड्रिंक्सच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक ब्रेक नादुरुस्त झाल्याने एका धोकादायक वळणावर उलटला. या घटनेत ट्रकचालक जखमी झाला असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर काही वेळातच ट्रकमधील सर्व पाण्याच्या बाटल्या व कोल्ड्रिंक्स या मार्गावरून जाणार्या प्रवाशांनी लुटून नेल्या.
- Advertisement -
अपघात घडल्याची माहिती समजताच करंजी पोलीस चौकीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ शेख व महामार्ग पोलीस पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी वाहतूक सुरळीत केली. करंजी घाटातील या धोकादायक वळणावर सातत्याने जड वाहनांचे अपघात होत असून या ठिकाणी आणखी मोठा रस्ता बनावा अशी अपेक्षा वाहनधारक करत आहेत.




