Monday, July 22, 2024
Homeक्राईमकरंजीत 25 लाखांचा सव्वाशे किलो गांजा जप्त

करंजीत 25 लाखांचा सव्वाशे किलो गांजा जप्त

मुंबई नार्कोटिक्स पथकाची कारवाई

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

- Advertisement -

निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील (Nirmal National Highway) करंजी (ता. पाथर्डी) येथे रविवारी (दि.23) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या एनसीबी पथकाने (Mumbai NCB Team) दगडवाडी फाटा बायपासजवळ सापळा रचून 25 लाख रूपयांचा दीडशे किलो गांजा जप्त (Cannabis Seized) केला. याप्रकरणी चार संशयित आरोपी व त्यांच्याकडील दोन चारचाकी वाहने पोलीसांनी (Police) ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे करंजीसह (Karanji) परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या कारवाईबाबत पथकाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनूसार निर्मळ-नांदेडमार्गे पुणे (Pune) व मुंबईकडे (Mumbai) गांजाची चोरटी वाहतूक करणारे वाहन जाणार असल्याची माहिती समजल्यानंतर या पथकाने रविवारी सकाळी सात वाजल्यापासूनच दगडवाडी फाटा ते करंजी घाटापर्यंत सापळा लावला होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक तवेरा व स्विफ्ट गाडी संशयित वाटल्याने या गाडीतील तरुणांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडील पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट गाडीमध्येसुमारे सव्वाशे किलो गांजा (Cannabis) आढळून आला.

त्यामुळे या पथकाने चार संशयित आरोपी व त्यांच्याकडील सव्वाशे किलो गांजा (Cannabis) व दोन्ही चार चाकी वाहने ताब्यात घेतली आहेत. या कारवाईबाबत दिवसभर दगडवाडी फाटा (Dagadwadi Phata) या ठिकाणी या पथकाकडून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे करंजीमार्गे शेवगावकडे जात असतांना त्यांना या पथकाने केलेल्या कारवाईची माहिती समजल्यानंतर त्यांनी देखील या पथकातील अधिकार्‍यांशी संवाद साधला.

दिवसभर संभ्रम
कारवाई करणारे पथक मुंबईचे (Mumbai) तर ताब्यात घेतलेले संशयित आरोपी नगर जिल्ह्याच्या बाहेरचे असल्यामुळे या कारवाईबाबत बराच वेळ नेमकी माहितीसमोर येत नव्हती. यामुळे संभ्रमाचे वातावरण होते. परंतु जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व स्थानिक पोलीस यांनी या पथकाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर याबाबतची सविस्तर माहितीसमोर आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या