Friday, April 24, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : लखनौसमोर राजस्थानचे आव्हान; प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी सुपर जायंट्सची धडपड

IPL 2026 : लखनौसमोर राजस्थानचे आव्हान; प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी सुपर जायंट्सची धडपड

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा दुसरा टप्पा आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. बुधवारी (दि.२२) लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (Lucknow Super Giants and Rajasthan Royals) यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. बाद फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

लखनौ सुपर जायंट्ससाठी हा सामना अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सवर विजय (Won) मिळवून दमदार सुरुवात करणाऱ्या लखनौला आता घरघर लागली आहे. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि आरसीबीविरुद्ध सलग तीन पराभव पत्करावे लागल्याने रियान परागच्या नेतृत्वाखालील या संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा संघ मागील सामन्यात केकेआरविरुद्ध (KKR) निसटत्या पराभवानंतर पुन्हा एकदा विजयाची लय पकडण्यासाठी सज्ज झाला आहे. कर्णधार ऋषभपंतच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ गुणतालिकेत (Points Table) वरचे स्थान गाठण्यासाठी उत्सुक आहे.

आकडेवारी काय सांगते ?

इतिहास आणि आकडेवारीवर नजर टाकली असता राजस्थान रॉयल्सचे पारडे जड असल्याचे दिसते. दोन्ही संघ ६ वेळा मिडले असून, राजस्थानने ४ वेळा तर लखनौने २ वेळा विजय मिळवला आहे. एकाना स्टेडियमवर झालेल्या एकमेव सामन्यात राजस्थानने लखनौचा पराभव केला होता.

ताज्या बातम्या

विधान

MLC BJP Candidate List: विधान परिषदेसाठी भाजपचे धक्कातंत्र; ३० उमेदवारांची यादी...

0
मुंबई | Mumbaiआगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत ३० जणांची नावे निवडण्यात आली. ही यादी दिल्लीत पाठवण्यात आली...