मुंबई | Mumbai
प्रसिद्ध स्टँण्ड अप कॉमेडियन प्रणित मोरे याचा शो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. आधी त्याच्या कार्यक्रमात आलेल्या हिमांशू जांगडाच्या विधानाने वादात सापडला होता. त्याने 370 रुपयांच्या बिर्याणीवरून वादग्रस्त विधान केले. त्यानंतर सर्व स्तरातून यावर टीका व्हायला लागली. त्यानंतर, मुंबईच्या केईएम रुग्णालयात शिकणाऱ्या डॉक्टर विद्यार्थी असलेली सेजल पवारने केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा झाली. मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अश्लील वक्तव्य करणारी डॉक्टर सेजल पवारच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबईच्या केईएम रुग्णालयातील एमबीबीएस शिक्षण घेणारी विद्यार्थीनी सेजल पवार हिने स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कार्यक्रमामध्ये केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरात व्हायरल झाला असून, त्यावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकारानंतर केईएमने सेजल पवारला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अश्लील वक्तव्य केल्या प्रकरणी सेजल पवार ज्या रुग्णालयात लास्ट ईयरचं शिक्षण घेतेय, त्या KEM रुग्णालयानं याप्रकरणी सखोल चौकशीचे निर्देश देत, चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणावर कारवाई केली जाईल, असे रुग्णालयाच्या डीनचे म्हणणे आहे.
IAF Plane Crash: भारतीय वायू दलाचं एएन-३२ विमान कोसळलं; ५ जवान शहीद, आसाममधील दुर्घटनेनं देश हळहळला
स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे यांच्या शोची क्लिप व्हायरल झाल्यानंतर वादात सापडलेल्या केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसची विद्यार्थिनी सेजल पवारला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या काळात सेजल पवारला केईएम रुग्णालय परिसर, वैद्यकीय महाविद्यालय आणि वसतिगृहात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. विद्यार्थिनी ही अद्याप वैद्यकीय शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी असल्याने तिच्याबाबतच्या सर्व बाबी नियम आणि मार्गदर्शक सूचनांनुसार हाताळल्या जातील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सेजल पवार हिच्या व्हिडिओतील विधानांमुळे संस्थेच्या प्रतिमेवर झालेल्या परिणाम यासाठीची तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाच सदस्यांच्या समितीत वरिष्ठ प्राध्यापकांसह बाह्य सदस्यांचाही समावेश असणार आहे. या समितीच्या कार्यकक्षेत कोणत्या मुद्द्यांचा समावेश करायचा याबाबत अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर चौकशीला सुरुवात होईल.
वादानंतर वाढता तणाव आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचा विचार करून सेजल पवार यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुरक्षितपणे सोपविण्यात आले आहे. चौकशीदरम्यान सेजल पवार भावनिक झाल्या असून त्यांनी खेद व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यावसायिक समुपदेशन (काऊन्सेलिंग) घेण्याचा सल्लाही प्रशासनाने दिला आहे.
व्हायरल व्हिडिओ, त्यासंबंधित तथ्ये आणि त्याचे परिणाम यांचा समितीकडून सखोल अभ्यास केला जाणार आहे. समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले जाण्याची शक्यता असून, अहवालाच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही अंतिम निष्कर्ष काढला जाणार नसून, संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाईल, असे केईएम प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




