Saturday, June 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजKerala CM : केरळमच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला; काँग्रेसकडून 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Kerala CM : केरळमच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला; काँग्रेसकडून ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली | New Delhi

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ( Assembly Elections) भाजपला पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरीत यश मिळाले होते. तसेच तामिळनाडूत (Tamilnadu) सत्ताधारी डीएमकेची सत्ता उलथवून टाकत अभिनेता विजय थलपती याचा टीव्हीके पक्ष सत्तेत आला आहे. तर केरळमध्ये (Kerala) तब्बल दहा वर्षानंतर काँग्रेसच्या हाती सत्ता आली. या निवडणुकीच्या निकालानंतर इतर चारही राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला होता.

- Advertisement -

मात्र, केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चांगलीच चुरस होती. त्यामुळे याठिकाणी पेच निर्माण झाला होता. अखेर काँग्रेसने (Congress) केरळम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा केली असून,नाव घोषित करताना धक्कातंत्राचा वापर केला आहे. काँग्रेस हायकमांडने केरळमच्या मुख्यमंत्रीपदी विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन (V.D. Satishan) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता ते केरळमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान, केरळमच्या मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय के.सी.वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची नावे आघाडीवर होती. मात्र, या दोघांचीही नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडली असून, काँग्रेसने व्ही.डी.सतीशन यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता लवकरच व्ही.डी.सतीशन मुख्यमंत्रीपदाची शपथ (CM Oath) घेतील.

कोण आहे व्ही. डी. सतीशन?

व्ही.डी.सतीशन यांच्या कार्यशैलीत उच्च शिक्षणाचा मोठा वाटा आहे. त्यांनी केरळ लॉ अकादमीतून एलएलबी आणि शासकीय विधी महाविद्यालयातून एलएलएम पूर्ण केले आहे. राजकारणात पूर्णवेळ येण्यापूर्वी त्यांनी केरळ उच्च न्यायालयात १० वर्षे वकिली केली, ज्यामुळे त्यांना कायद्याच्या तांत्रिक बाजूंची उत्तम समज आहे. त्यांनी एमएसडब्ल्यू (सोशल वर्क) मध्येही पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

राजकीय वाटचाल

सतीशन यांनी आपला राजकीय प्रवास विद्यार्थी दशेत एनएसयुआय मधून सुरू केला.तळागाळातून काम करत त्यांनी आपली पकड मजबूत केली. सलग सहा वेळा आमदार राहिले आहेत. २००१ पासून आजवर (२००१, २००६, २०११, २०१६, २०२१ आणि २०२६) ते परवूर मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आले. २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या काळात त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून सत्ताधाऱ्यांना अनेकदा अडचणीत आणले.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Crime News : ‘बंटी-बबली’ वकिलासह टोळी जाळ्यात; इंदिरानगर पोलिसांची कामगिरी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बनावट राजपत्रात नावनोंदणी करून आधारकार्डमध्ये बदल करत बनावट व्यक्ती उभा करून भूखंडाची विक्री करणाऱ्या बंटी-बबली वकिलांसह आठ संशयितांच्या इंदिरानगर पोलिसांनी...