Thursday, May 2, 2024
Homeराजकीयफडणवीसांच्या कारस्थानांमुळे पक्ष सोडला - खडसे

फडणवीसांच्या कारस्थानांमुळे पक्ष सोडला – खडसे

जळगाव – Jalgaon

भाजपचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज आपल्या भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझी पक्षावर नाराजी नसून…

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारवायांमुळे सदस्यत्वाचा राजीनामा देवून पक्ष सोडत आहे. गेल्या महिनाभरापासून खडसे राष्ट्रवादीत जाणार यावर राजकारणात मोठी चर्चा होती, त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे.

गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. मी केलेल्या कतृत्वाच्या ताकदीवर विविध पदे मिळविली ती कोणी उपकाराने दिली नाहीत, त्यामुळे मी पक्षावर, कार्यकारीणीवर नाराज नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले.

- Advertisment -

ताज्या बातम्या