Monday, July 27, 2026
Homeक्राईमCrime News : अपहृत अल्पवयीन मुलीची श्रीरामपूरमधून सुटका

Crime News : अपहृत अल्पवयीन मुलीची श्रीरामपूरमधून सुटका

संशयित अटकेत || कोतवाली पोलिसांची कामगिरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा (वय 16) शोध घेण्यात कोतवाली पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ऑपरेशन मुस्कान अभियानांतर्गत करण्यात आली.

- Advertisement -

9 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बोल्हेगाव एमआयडीसी परिसरातील रहिवासी प्रकाश सावंत याने संबंधित अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल दिली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनेनंतर संशयित आरोपी आणि मुलगी यांचा मोठ्या प्रमाणावर शोध घेण्यात आला, मात्र दोघेही सापडत नव्हते. दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत मुलगी व संशयित हे श्रीरामपूर येथे असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व त्यांचे पथक तातडीने श्रीरामपूर येथे रवाना झाले. तेथे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मदतीने शोध घेण्यात आला. पथकाने अल्पवयीन मुलगी व संशयिताला ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. संशयित प्रकाश सावंत याला अटक करण्यात आली आहे. सदर मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ जुलै २०२६ – यश शिरावर घेताना,विवेक पायाशी हवा

0
जंतरमंतरच्या ऐतिहासिक मैदानावर नुकताच घडलेला घटनाक्रम भारताच्या तरुणाईच्या अफाट ताकदीची आणि संघटित ऊर्जेची साक्ष देणारा ठरला. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या ‘जेन झी’ पिढीचे प्रतिनिधित्व...