Thursday, May 2, 2024
Homeनगरमारहाणीत आदिवासी महिलेसह, पोटातील बाळाचा मृत्यू

मारहाणीत आदिवासी महिलेसह, पोटातील बाळाचा मृत्यू

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुरेगाव येथील मनीषा दत्तात्रय भोसले (वय-25) या आदिवासी महिलेला जुन्या कारणावरून खरातवाडी येथील आदिवासी समाजाच्या आठ जणांनी बंदुकीचा धाक दाखवून विसापूर रेल्वे रुळाजवळ 24 नोव्हेंबर रोजी बेदम मारहाण केली होती. तिच्यावर उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला. या मारहाणीत महिलेच्या पोटातील बाळ जन्माला येण्यापूर्वीच मृत झाले असल्याने याबाबत बेलवंडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेगाव येथील मनीषा भोसले या 24 नोव्हेंबर रोजी विसापूरच्या आठवडे बाजारवरून येत असताना घड्याळ्या चव्हाण या आरोपीचे जुन्या भांडणाच्या करणातून आदिक काळे, समीर काळे, जाहीर काळे, जावेद काळे, घड्याळ्या काळे, प्रवीण भोसले, भैय्या भोसले या आठ जणांनी विसापूर रेल्वे रुळाजवळ अडवले व बेदम मारहाण केली. यात मनिषा गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना 9 डिसेंबर रोजी या महिलेचा मृत्यू झाला तर याच मारहाणीत या महिलेच्या पोटात असलेले बाळ देखील मयत झाले. या प्रकरणी रमेशबाई आंबरलाल काळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मृत्यू झाल्या बाबत आठ जणांच्या विरोधात गुन्हा बेलवंडी पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या