Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलाल वादळ नाशिकच्या वेशीवर धडकणार

लाल वादळ नाशिकच्या वेशीवर धडकणार

सुरगाणा, पेठ, कळवणचे आंदोलनकर्ते जमा होण्यास सुरुवात

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

किसान सभेचे शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता दिंडोरी तहसील व इतर ठिकाणी सुरू असलेले बिर्‍हाड आंदोलन दिंडोरी येथे सहाव्या दिवशीही सुरूच असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार असल्याचे आंदोलनकत्यांनी सांगितले. आता आंदोलनकर्त्यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने सुरगाणा, कळवण, पेठचे आंदोलनकर्ते दिंडोरी येथे जमा होत असून दिंडोरी तहसिल कार्यालय परिसर यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हे आंदोलनकर्ते नाशिककडून मुंबईकडे रवाना होणार आहे.

नाशिक जिल्हा किसान सभा, माकपा, डीवायएफएस व जनवादी महिला संघटनांनी शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी दिडोरी तहसील कार्यालयासमोर सहा दिवसांपासून चक्काजाम आंदोलनाचा विडा उचलला आहे. कडायाची थंडी, अंधारी रात्र व दिवसाचे तळपते ऊन अंगावर घेत आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून आहे. रस्त्यावरच आपली तीन विटांची चूल पेटवून त्यावर खिचडी शिजविली जात आहे. आपले घरदार मागे टाकून आपल्या हक्काच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची ठाम पवित्रा घेतल्याने प्रशासनाची चांगलीच अडचण वाढणार असल्याचे दिसत आहे.

याप्रसंगी किसान सभा जिल्हा सेक्रेटरी रमेश चौधरी, माक्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी देविदास वाघ, डीवायएफएस जिल्हा सचिव आप्पा वटाणे यांच्यासह किसान सभा समिती, पक्षाचे तालुका समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, आदिवासी बांधव तहसील कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहे. सुरगाणा, कळवण, चांदवड आणि पेठ तालुयातील हजारो आंदोलकउद्या सायंकाळीपर्यंत नाशिकच्या वेशीवर धडकणार आहे.

सुरगाणा | प्रतिनिधी
सुरगाणा तालुका किसनसभेचे लाल वादळ उद्या संध्याकाळ पर्यंत नाशिकच्या वेशीवर धडकणार आहे.
कॉ. जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथून पायी लाल वादळ नाशिकच्या दिशेने निघाले होते. पांडाणे येथे मुक्काम पार पडला. पुन्हा सुमारे सहा ते सात हजार आंदोलकांचे लाल वादळ नाशिकच्या दिशेने निघाले आहे. शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नांंच्या रास्त मागण्या असूनही जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. शिवाय दखलही घेतली नाही आंदोलकांची कोणतीही व्यवस्था केली नाही.

जिल्हा प्रशासनाने तर शिष्टमंडळाला उडवा उडावीची उत्तरे दिल्याने शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉ.जे. पी. गावित यांनी संताप व्यक्त केला आहे. फसव्या आणि विश्वास घातकी सरकार विरुद्ध आरपारच्या लढाईत यावेळी मागे हटायचेच नाही, आपल्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करायचा असा पक्का निर्धार केल्याने आंदोलकांची गर्दी वाढत चालली आहे.

ताज्या बातम्या

चिमुकल्यांच्या स्वागतासाठी प्रशासकीय अधिकारी उद्या शाळांमध्ये

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik उन्हाळी सुटीच्या आनंदी आठवणींची शिदोरी घेऊन चिमुकली पावले पुन्हा एकदा ज्ञानमंदिराच्या उंबरठ्यावर सोमवारपासून येणार आहेत. या नव्या शैक्षणिक पर्वाच्या मंगल...