Thursday, March 13, 2025
Homeनगरपतंग उडवताना विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

पतंग उडवताना विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्दची घटना

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथे पतंग खेळताना जवळच असणारी पाण्याची खोल विहीर लक्षात न आल्याने एक आठ वर्षीय मुलगा या विहिरीत पडून मृत्युमुखी पडला. ही घटना बुधवारी 25 डिसेंबरला दुपारच्या दरम्यान घडली. सावळीविहीर खुर्द येथील पहिलीत शिकत असलेला यश हिरामण सोनवणे (वय 8) हा मुलगा नाताळची सुट्टी असल्यामुळे घरी होता. तो पतंग खेळत असताना जवळच असणार्‍या व कठडा नसणार्‍या एका विहिरीमध्ये पडला. त्याच्यासमवेत असणारी इतर लहान मुले ओरडल्यामुळे आसपासचे लोक जमा झाले.

- Advertisement -

अशोकराव जमधडे, सुधीर वर्पे, महेश जमधडे, सागर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिर्डीचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी पोलीस पथकासह तात्काळ भेट दिली. साई संस्थान व शिर्डी नगरपालिकेचे अग्निशामक बंब पथकासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी सुमारे 50 फूट खोल विहिरीतून अडीच तासांनंतर मोठ्या प्रयत्नाने या मुलाला बाहेर काढले. परंतु तो मयत झाला होता.

पतंग खेळताना या चिमुकल्याचा जीव गेला असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...