Monday, November 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदोन अपघात अनेक सवाल! गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने दोघांना चिरडलं, तर बीडमध्ये...

दोन अपघात अनेक सवाल! गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने दोघांना चिरडलं, तर बीडमध्ये नगरसेवकाच्या मुलाने दोघांना उडवलं

कोल्हापूर | Kolhapur
कोल्हापूरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वाहन चालवण्याच्या प्रकारामुळे दोन तरुणांचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवाजी विद्यापीठाजवळ शाही टोल नाका रस्त्यावर एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात उमेश पाथरूड आणि गणेश पाथरूड या दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित कार गोकुळ दूध संघाचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांचा मुलगा पद्मसिंह रणजितसिंह पाटील चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापुरातील (Kolhapur) मध्यरात्रीच्या ड्रंक अँड ड्राईव्हचा हा थरार आता जिल्हाभर चर्चेत आहे.

कोल्हापुरात मध्यरात्री ड्रंक आणि ड्राईव्हचा थरार पाहायला मिळाला. त्यामध्ये, गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांच्या चिरंजीवाच्या कारने दोघांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी पद्मसिंह रणजितसिंह पाटील याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठा जवळ ही थरारक घटना घडली. या दुर्घटनेत दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ होत आहे. उमेश पाथरूड आणि गणेश पाथरूड असे अपघातातील मृतांची नावे आहेत. दरम्यान, विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर पद्मसिंह पाटील घटनास्थळावरून पळाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -

Nashik News: शालिमार अतिक्रमणांच्या विळख्यात; पादचारी त्रस्त, वारंवार वाहतूक कोंडीने ताण

बीडमध्ये नगरसेवकाच्या मुलाने दोघांना उडवले
बीडच्या माजलगाव येथील गढी रोडवर झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी घडलेल्या या अपघातामध्ये गायकवाड दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. माजलगाव येथील भाजपाचे नगरसेवक दिलीप मेंडके यांचा मुलगा दक्ष मेंडके हा युवक चार चाकी गाडी चालवत होता. यावेळी तरुणांची गाड्यांची रेस सुरू होती असं स्थानिकांनी सांगितलं तसेच या रेष च्या नादात या दुचाकीवरील कुटुंबाला शंभर ते दीडशे फूट फरफटत नेलं, असल्याचं प्रत्यक्षदर्शनी सांगितलं.

ताज्या बातम्या

कसोटी

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना अनिर्णित; WTC मध्ये खेळण्यासाठी ‘असं’ असेल...

0
वेलिंग्टन | Welingtonभारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावरील पहिला कसोटी सामना अनिर्णित सुटला असून, यामुळे ही मालिका आता 0-0ने बरोबरीत आहे....