Sunday, June 14, 2026
Homeक्राईमSangamner : कोल्हेवाडी रस्ता परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली

Sangamner : कोल्हेवाडी रस्ता परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली

संगमनेर शहर पोलिसांची कारवाई || पाच दिवस पोलीस कोठडी

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील कोल्हेवाडी रस्ता परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला संगमनेर शहर पोलिसांनी साधनसामुग्रीसह अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.2) पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यामध्ये सहा जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत (दि.6) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हेवाडी रस्ता येथील मोकळ्या जागेत काही संशयित इसम अंधाराचा फायदा घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्फत पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत सलीम अकबर पठाण (वय 26, रा. जमजम कॉलनी), हलीम अकबर पठाण (वय 24, रा. जमजम कॉलनी), वसीम मन्सूर शेख (वय 38, रा. मदिनानगर), नीलेश बाळासाहेब शेळके (वय 40, रा. वाघापूर), सलमान अकबर पठाण (वय 24, रा. कोल्हेवाडी रस्ता) आणि अनमोल कुरणवाशी चव्हाण (वय 20, रा. घुलेवाडी) या सहा जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडे तीन दुचाकी, गुप्ती, कोयता, लोखंडी पान्हे, लोखंडी कुर्‍हाड, मिरची पूड, मोबाईल आदी साहित्य आढळून आले.

दरम्यान, कारवाईदरम्यान एक आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यालाही ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होतील असा अंदाज शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी वर्तवला आहे. सदर कारवाईत पोलिसांनी एकूण 1 लाख 76 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे, सागर नागरे, राहुल पांडे, विजय आगलावे व लक्ष्मण खेडकर यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करीत आहे.

ताज्या बातम्या

Solapur News : भीषण अपघात! पिकअप विहिरीत कोसळून 14 भाविकांचा जागीच...

0
सोलापूर । Solapur सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शनाचा आनंद घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे....