Wednesday, November 25, 2026
HomeराजकीयManoj Jarange Patil : “आरोप करायला अक्कल लागत नाही…”; मनोज जरांगेंनी CM...

Manoj Jarange Patil : “आरोप करायला अक्कल लागत नाही…”; मनोज जरांगेंनी CM फडणवीसांवर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर

शिर्डी । Shirdi

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून राजकीय वाकयुद्ध अत्यंत तीव्र झाले आहे. मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.

- Advertisement -

या निर्णयावरून जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरूनच ही कारवाई झाल्याचा खळबळजनक आरोप केला. मात्र, या टीकेनंतर सत्ताधारी भाजपकडून तातडीने पलटवार करण्यात आला असून, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट जरांगे यांच्या अभ्यासावर आणि कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

अंतरवाली सराटी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडताना प्रशासकीय निर्णयांवर ताशेरे ओढले. बावनकुळे यांच्या दबावामुळे मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाली असल्याचा दावा करत त्यांनी सवाल केला, “बावनकुळे इतके मोठे झाले का? फडणवीसांनी बावनकुळेंना एवढे अधिकार दिले का? फडणवीस, तुम्ही उगाच मराठ्यांना अंगावर घेतले आहे.” याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या ५० आमदारांना पाडण्याचा इशाराही जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगे यांच्या या विधानांनंतर भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना आक्रमक पवित्रा घेतला. जरांगेंच्या आरोपांचा समाचार घेताना दरेकर म्हणाले, “एखाद्यावर आरोप करायला फार अक्कल लागत नाही. रस्त्यावर आणि नाक्यावर बसून आंदोलन करणे आणि सिस्टिम (प्रशासन) समजून घेऊन काम करणे, या दोन गोष्टींमध्ये मोठा फरक असतो.”

प्रशासकीय प्रक्रियेची माहिती देताना दरेकर यांनी स्पष्ट केले की, जात पडताळणी समितीला अर्धन्यायालयीन अधिकार असतात. त्यात कोणताही मंत्री थेट हस्तक्षेप करू शकत नाही किंवा लेखी आदेश देऊ शकत नाही. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्या म्हणूनच संबंधित नोंदी रद्द झाल्या असतील. झोपलेल्या माणसाला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

जरांगे यांनी आमदारांना पाडण्याच्या दिलेल्या इशार्‍यावर बोलताना दरेकर म्हणाले, “महाराष्ट्र हे सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारे राज्य आहे. समाज तोडण्यापेक्षा जोडण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही.” तसेच, जर जरांगे पाटील यांना सिस्टिम कशी चालते हे समजून घ्यायचे असेल, तर त्यांनी स्वतः एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवून विधीमंडळात यावे. मग त्यांना प्रशासकीय कामांची गुंतागुंत समजेल. “ते जर सत्ताधाऱ्यांचे ५० आमदार पाडू शकत असतील, तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत,” असे आव्हानही दरेकर यांनी दिले. या आरोप-प्रत्यारोपामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा हा मुद्दा राजकीय पटलावर अधिकच तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जलजीवनच्या 157 योजना दीड महिन्यात पूर्ण करा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांना अद्याप पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील 90 टक्क्यांहून...