Wednesday, July 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'लाडकी बहीण' योजनेमुळे शासनाचा आर्थिक ताण वाढला; भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे शासनाचा आर्थिक ताण वाढला; भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर

सातारा | Satara
महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गाजलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असतानाच, आता खुद्द महायुतीमधील बड्या नेत्यानेच या योजनेवर थेट बोट ठेवले आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे बोलताना लाडकी बहीण योजनेमुळे इतर कामांचे फंडिंग रखडल्याचे वक्तव्य केलेय. उदयनराजेंच्या या थेट विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

विकासकामांना निधी पोहोचायला पाहिजे तितका निधी पोहोचत नाही
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. “लाडकी बहीण योजनेमुळे शासनाचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला असून विविध ठिकाणी जितका विकासकामांचा निधी पोहोचायला पाहिजे, तितका तो पोहोचत नाहीये,” असे अत्यंत मोठे आणि खळबळजनक विधान साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. उदयनराजेंच्या या घरच्या आहेरामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेच्या नगरसेवकांची रविवारी बैठक घेतली होती. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

Rahul Gandhi: महंगाई मॅन म्हणत राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका, म्हणाले, खिशावर वार करायचा, हेच…

लाडकी बहीण योजनेमुळे शासनाचा आर्थिक ताण वाढला
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, “लाडकी बहीण योजना शासनाने राबवली, त्यामुळे राज्यावर आणि तिजोरीवर आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विविध विकासकामांसाठी सध्या अपेक्षित निधी पोहोचत नाहीये. अशा परिस्थितीत शहराच्या कामांचे नियोजन कसे करता येईल आणि यातून नेमका मार्ग कसा काढता येईल, याच धोरणात्मक विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही ही बैठक घेतली होती.”

या बैठकीत दोन्ही राजे कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. पालिकेच्या चालू असलेल्या कामांमध्ये कुठलाही सावळागोंधळ किंवा ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा दोन्ही नेत्यांनी प्रशासनाला दिला. “अनेक नगरसेवक हे प्रथमच निवडून आले आहेत, त्यामुळे पालिकेच्या मुख्याधिकारी आणि विभागप्रमुखांनी त्यांना कामात पूर्ण सहकार्य आणि योग्य मार्गदर्शन करावे,” अशा सक्त सूचनाही उदयनराजेंनी दिल्या.

ताज्या बातम्या

Nashik News : पालखेड धरणाचा विसर्ग घटवला; गंगापूर धरणातून गोदावरीत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने (Water Resources Department) धरणांमधून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यास सुरुवात केली आहे. आज...