Monday, September 28, 2026
Homeदेश विदेशRahul Gandhi: महंगाई मॅन म्हणत राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका, म्हणाले, खिशावर...

Rahul Gandhi: महंगाई मॅन म्हणत राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका, म्हणाले, खिशावर वार करायचा, हेच…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशात इंधन दरवाढीमुळे सर्वसमान्यांचे कंबरडे मोडले असताना आर्थिक घडी पुन्हा विस्कळीत झाले. पेट्रोल आणि डिझेल महागल्याने वाहतूक खर्च वाढत असून त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होत आहे. १२ दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किमतीत चार वेळा वाढ झाली असून पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या आहे. अशातच काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

घामाच्या धारा वाढणार, उन्हाचा पारा आणखी चढणार; आजपासून ‘नवतपाला’ सुरवात, ‘या’ गोष्टी करणं टाळा

- Advertisement -

राहुल गांधींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींचा ‘महागाई मॅन’ असा उल्लेख केला असून केंद्र सरकारने जनतेच्या खिशावर हळूहळू वार केल्याचा त्यांनी आरोप केला. ते म्हणाले की, “केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर टप्प्याटप्प्याने वाढवले जात आहेत, जेणेकरून सामान्य नागरिकांच्या लगेच लक्षात येऊ नये. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून देशात आर्थिक संकट येण्याचा इशारा दिला होता. मात्र, पंतप्रधान मोदी निवडणुकांमध्ये व्यस्त होते. निवडणुका संपताच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली. यापुढेही इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणुकांमध्ये आश्वासने द्यायची आणि उर्वरित काळात जनतेच्या खिशावर वार करायचा, हेच मोदी सरकारचे काम आहे,” अशी टीका त्यांनी केली.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे वाढले?

15 मे- पेट्रोल- 3 रुपये, डिझेल- 3.11 रुपये

19 मे- पेट्रोल- 87 पैसे, डिझेल- 90 पैसे

23 मे- पेट्रोल- 90 पैसे, डिझेल- 91 पैसे

25 मे- पेट्रोल- 2.61 रुपये, डिझेल 2.17 रुपये

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळामुळे जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी आणखी वाढणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कर्जमाफीच्या घोषणेमुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अर्थकारणावर यंदाच्या दुष्काळाचेही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य...