Saturday, August 15, 2026
HomeनगरLadki Bahin Yojana : लाडक्या बाहिणींसाठी 410 कोटी 30 लाख रूपयांच्या निधीस...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बाहिणींसाठी 410 कोटी 30 लाख रूपयांच्या निधीस मंजुरी

ऑक्टोंबरच्या हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3960 कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. यातील सामाजिक न्याय विभागाकडून 410.30 कोटी रुपये (अक्षरी रुपये चारशे दहा कोटी तीस लाख) ऑक्टोबर 2025 चा हप्ता वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर 2025 चा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी केलेल्या माहितीनुसार, जुलै 2024 ते जून 2025 या कालावधीत या योजनेवर 43,045.06 कोटींचा खर्च झाला आहे.सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. सदर वितरीत निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पध्दतीने काटकसरीच्या उपाययोजना करुन खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik News : कपालेश्वर मंदिर परिसरात तृतीयपंथींचा गोंधळ; भाविकांची गैरसोय

0
पंचवटी | प्रतिनिधी |Panchvati श्रावण महिन्यातील शनिवार आणि सोमवारी कपालेश्वर मंदिरात (Kapaleshwar Temple) दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी (Crowd) होत असल्याने मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात...