मुंबई | Mumbai
महायुती सरकारला (Mahayuti Government) विधानसभा निवडणुकीत तारणार्या लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) नवीन वर्षातील जानेवारी महिन्यातील हप्ता कधी मिळणार याकडे, संपूर्ण महिला वर्गाचे लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून २१०० रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. पंरतु, अद्याप लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा वाढीव हफ्ता मिळालेला नाही.
अर्थसंकल्पानंतर (Budget) महिलांना २१०० रुपयांचा वाढीव हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आता लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हफ्ताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून पुढील ७२ तासांत या योजनेस पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडकी बहीण योजनेच जानेवारीचा हप्ता २६ जानेवारी रोजी जमा होणार आहे. त्यामुळे जानेवारी (January) महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळणार आहेत.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात शेवटच्या आठवड्यात जमा झाले होते. त्यानंतर आता जानेवारीचे पैसे देखील शेवटच्या आठवड्यात मिळणार आहेत. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे. अपात्र असूनही या महिला योजनेचा लाभ घेत होत्या, त्यामुळे त्यांनी स्वतः हून हे अर्ज माघारी घेतले आहेत.