Monday, September 28, 2026
HomeनगरShrirampur : जमिनीचा ताबा घेण्याच्या कारणावरुन एकास मारहाण

Shrirampur : जमिनीचा ताबा घेण्याच्या कारणावरुन एकास मारहाण

टाकळीभान येथील घटना || सात जणांविरुध्द श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

वफ्फ बोर्ड जमिनीचा ताबा घेण्याच्या कारणावरुन श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील एकास गैरकायद्याची मंडळी जमवून अर्वाच्चपणे शिवीगाळ करुन कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच घरातील संसार उपयोगी वस्तूंची तोडफोड केल्याची घटना घडली. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तन्वीर सलीम शेख (रा. टाकळीभान) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन इमाम बादशहा शेख, यास्मीन इमाम शेख, निशान इमाम शेख, रज्जाक इमाम शेख, रेहान इमाम शेख (सर्व रा. टाकळीभान, ता.श्रीरामपूर) तसेच तैफिक सत्तार शेख (रा. वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर), मुज्जू सादिक सय्यद (रा.पाथर्डी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी कुटूंबासमवेत टाकळीभान येथे राहत असून टाकळीभान शिवारातील वफ्फ बोर्ड जमीन गट नं. 49 मधील जमीन मी करतो तसेच काही जमिनी बादशहा शेख (रा. टाकळीभान) हे कसतात. मी कसत असलेली जमीन ही यापुढे माझा ताबा काढून घेऊन बादशहा शेख संपूर्ण जमीन ठेवण्याच्या कारणावरुन आमच्यात वाद आहे. दि. 4 मार्च रोजी मी घरी असताना बादशहा शेख हा काळ्या रंगाच्या स्विप्ट कारमधून वरील इसमांसमवेत आला.

वरील इसमांनी घरात घुसून मला शिवीगाळ करुन कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच माझ्या घरातील संसार उपयोगी साहित्याची तोडफोड केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कपाटातील 65000 हजार रुपये काढून घेतले. या घटनेत माझी पत्नीही जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन पोलिसांनी वरील आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...